अ‍ॅँजेलिनाच्या वडिलांची इच्छा, दोघांनी यावे एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2016 09:24 PM2016-11-13T21:24:55+5:302016-11-13T21:24:55+5:30

प्रसिद्ध अभिनेता जॉन वोइट यांना आशा आहे की, अ‍ॅँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांच्यातील मतभेद लवकरच दूर होतील. एका ...

Angel's father wishes, both of them come together | अ‍ॅँजेलिनाच्या वडिलांची इच्छा, दोघांनी यावे एकत्र

अ‍ॅँजेलिनाच्या वडिलांची इच्छा, दोघांनी यावे एकत्र

googlenewsNext
रसिद्ध अभिनेता जॉन वोइट यांना आशा आहे की, अ‍ॅँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांच्यातील मतभेद लवकरच दूर होतील. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार अ‍ॅँजेलिना जोली हिने गेल्या सप्टेंबर महिन्यात ब्रॅड पिट यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर दोघांच्या नात्यात चांगलीच दरार निर्माण झाली आहे. अशातही अ‍ॅँजेलिनाचे वडील जॉन वोइट दोघांमधील दूर होईल अशी आस लावून बसले आहेत. 
याविषयी जॉन वोइट यांनी सांगितले की, अ‍ॅँजेलिना आणि पिट यांच्या नात्यात सुधारणा व्हावी यासाठी लक्षावधी फॅन्स प्रार्थना करीत आहेत. मी त्या सर्वांचे आभार मानतो. तसेच अपेक्षा करतो की, येत्या काळात दोघांमधील मतभेद दूर होतील. 
या अगोदर जॉन वोइट यांनी अ‍ॅँजेलिनाच्या घटस्फोटाच्या निर्णयावर ‘१२ वर्ष एकत्र राहिल्यानंतर अ‍ॅँजेलिनाने घेतलेला निर्णय धक्कादायक आहे. काही तरी गंभीर कारण असेल तेव्हाच तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला असेल’,असे वक्तव्य केले होते. आता पुन्हा त्यांना जेव्हा याविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी, दोघांनी विभक्त होणे मला खूपच दु:खदायक वाटत आहे. परंतु मी अपेक्षा सोडलेली नाही. त्यांच्यात चांगल्या घडामोडी घडून येतील. दोघांनी एकत्र यावे हीच माझी इच्छा असेल. 
दरम्यान सध्यातरी अ‍ॅँजेलिना, पिटच्या नात्यात कुठल्याही प्रकारची सुधारणा होताना दिसून येत नाही. दर दिवसाला दोघांकडूनही घटस्फोटासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यामुळे जॉन वोइट यांनी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण होईल की नाही, हे येणाºया काळातच समोर येईल. तुर्तास दोघेही त्यांच्या वकिलांकडून घटस्फोटासाठी एकमेकांवर दबाव आणत आहेत. 


Web Title: Angel's father wishes, both of them come together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.