स्टारडम के लिए कुछ भी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2016 01:14 PM2016-11-20T13:14:59+5:302016-11-20T13:20:26+5:30

स्टार म्हटल्यावर लक्झरी वस्तू आणि उत्पादने वापरवेच लागतात. महागडे ड्रेसेस, डिझायनर शूज हे तर दैनंदिन जीवनाचे अविभाज्य भाग. परंतु ...

Anything for stardom | स्टारडम के लिए कुछ भी

स्टारडम के लिए कुछ भी

googlenewsNext
टार म्हटल्यावर लक्झरी वस्तू आणि उत्पादने वापरवेच लागतात. महागडे ड्रेसेस, डिझायनर शूज हे तर दैनंदिन जीवनाचे अविभाज्य भाग. परंतु जेव्हा तुम्ही नवकलाकार असता आणि अद्याप ‘स्टारडम’ मिळालेले नसते तेव्हा अशी चैन करणे परवडण्यासारखे नसते. पण ‘स्टेटस’साठी पदरमोड करून ते करावेच लागते.

आता ‘ट्वाईलाईट’ फेम अभिनेत्री अ‍ॅना केन्ड्रीकचेच पाहा ना. अ‍ॅना जेव्हा हॉलीवूडमध्ये नवखी होती तेव्हा तिच्या स्टायलिस्टने राहत्या घराच्या किरायापेक्षा महागडे शूज् घेण्यास भाग पाडले. एका टीव्ही शोवर तिने हा किस्सा सांगितला.

ती म्हणाली, ‘माझा ‘अप इन द एअर’ सिनेमा प्रदर्शित झालेला नव्हता. त्याच्या प्रोमोशनानिमित्त कार्यक्रमांना जाताना मी महागडे डिझायनर शूज् घालावेत असा सल्ला माझ्या स्टायलिस्टने दिला. त्यावेळी असे शूज् घेणे मला परवडण्यासारखे नव्हते. पण स्टायलिस्टने माझ्या मागे लागून लागून मला ते विकत घ्यायलाच लावले.’


स्टायलिश :अ‍ॅना केन्ड्री

‘स्टार’ झाल्यावर आयुष्य कसे बदलले याबाबत ती म्हणाली, ‘आपले आयुष्य पण बघा ना कसे विरोधाभासाने भरलेले आहे. आज मी एक यशस्वी अभिनेत्री आहे. महागड्या वस्तू स्वत: विकत घेऊ शकत असताना मला लोक फुकटात वस्तू वापरण्यास देतात. पण जेव्हा मी स्ट्रगल करत होते, अशी चैन करणे मला परवडणारे नव्हते तेव्हा मात्र कोणी मला अशी ‘सहृदया’ने मदत केली नाही.’

पण ते काही असो, महागड्या शूज्चा शुभ पायगुण म्हणा की आणखी काही. ‘अप इन द एअर’मधील तिच्या भूमिकेसाठी तिला त्यावर्षी सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्रीचे आॅस्कर नामांकन मिळाले होते. तेव्हापासून तिच्या करिअरने मोठी उडी घेतली.

cnxoldfiles/५०’ यासारख्या चित्रपटांतही तिने काम केले आहे.

Web Title: Anything for stardom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.