अरे देवा! तो मागून आला नि अनॉर्ल्ड श्वॉर्झनेगर यांना जोरात मारली लाथ!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 02:42 PM2019-05-20T14:42:33+5:302019-05-20T14:43:17+5:30
71 वर्षांचे बॉडीबिल्डर, मॉडेल, हॉलिवूड अॅक्टर व नेते अनॉर्ल्ड श्वॉर्झनेगर यांच्यासोबत अलीकडे जे काही झाले, ते पाहून अनेकांना धक्का बसला.
71 वर्षांचे बॉडीबिल्डर, मॉडेल, हॉलिवूड अॅक्टर व नेते अनॉर्ल्ड श्वॉर्झनेगर यांच्यासोबत अलीकडे जे काही झाले, ते पाहून अनेकांना धक्का बसला. होय,एका क्रिडा स्पर्धेदरम्यान एक अज्ञात व्यक्ती मागून आली आणि तिने अनॉर्ल्ड यांना इतकी जोरदार लाथ मारली की त्यांच्या कंबरेला दुखापत झाली. सध्या या हल्ल््याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Wow!! Former CA Governor Arnold @Schwarzenegger drop kicked at an event in South Africa. pic.twitter.com/u20xdnsESm
— Marcus Smith (@MarcusSmithKTLA) May 18, 2019
अनॉर्ल्ड गेल्या काही दिवसांपासून विविध क्रीडा स्पर्धेत स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी जात आहे. काही दिवसांपूर्वी अर्नोल्ड श्वॉर्झनेगर यांनी दक्षिण आफ्रिकेतील ‘अनॉर्ल्ड क्लासिक आफ्रिका’ हा स्पोर्ट इव्हेंटमध्ये हजेरी लावली. याचदरम्यानची ही घटना. इव्हेंट रंगात आला असताना एक अज्ञात व्यक्ती मागून आली आणि त्याने अनॉर्ल्ड यांना जोरदार लाथ मारली. ही लाथ इतकी जबरदस्त होती की, अनॉर्ल्ड यांच्या कंबरेत दुखापत झाली. सुरक्षा रक्षकांनी लगेच या हल्लेखोरास ताब्यात घेतले.
And if you have to share the video (I get it), pick a blurry one without whatever he was yelling so he doesn’t get the spotlight.
— Arnold (@Schwarzenegger) May 18, 2019
By the way... block or charge? pic.twitter.com/TEmFRCZPEA
अचानक झालेल्या या प्रकारामुळे अनॉर्ल्ड काही वेळ थक्क झाले. पण तोपर्यंत आपल्याला कुणी मागून लाथ मारलीय, हे त्यांच्या गावीही नव्हते. याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर आपल्याला कुणीतरी लाथ मारली, हे त्यांना कळले. . या हल्ल्यानंतर अनॉर्ल्ड यांनी ट्विट करत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. ‘मी ठिक आहे, मला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. स्पर्धेच्या ठिकाणी फार गर्दी असल्याने सुरुवातीला मला कोणीतरी धक्का दिला आहे असे मला वाटले. मात्र नंतर व्हायरल झालेले व्हिडीओ पाहिल्यावर मला कोणीतरी लाथ मारल्याचे दिसले, असे अनॉर्ल्ड यांनी ट्विट करत सांगितले.
अशा व्हिडीओवर लक्ष देण्यापेक्षा स्पर्धांवर लक्ष द्या असे आवाहनही त्यांनी केले. दक्षिण आफ्रिकेत दरवर्षी मे महिन्यात अनॉर्ल्ड क्लासिक आफ्रिका या क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत बॉडी बिल्डींग यांसह इतर खेळांचा समावेश असतो.