Avatar Sequals:इथेच संपणार नाही 'Avatar' ची गोष्ट; जेम्स कॅमरुन यांनी चित्रपटाबाबत दिली मोठी माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 08:20 PM2022-12-15T20:20:50+5:302022-12-15T20:21:41+5:30
Avatar Sequals: 'अवतार द वे ऑफ वॉटर' उद्या म्हणजेच 16 डिसेंबर रोजी रिलीज होत आहे.
James Cameron Avatar Sequals: प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट 'अवतार'चा सीक्वल 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar: The Way of Water) उद्या म्हणजेच 16 डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. चाहते या चित्रपटाची अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. अखेर 13 वर्षानंतर दिग्दर्शक जेम्स कॅमरुन (James Cameron) यांनी चित्रपटाचा दुसरा पार्ट आणला आहे. भारतात या चित्रपटाबाबत जबरदस्त क्रेझ आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्येच चित्रपटाची 5 लाखांपेक्षा जास्त तिकीटे विकल्या गेली आहेत.
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
या चित्रपटाच्या रिलीजसोबतच चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. जेम्स कॅमरुन यांनी अकरा वर्षांपूर्वीच याची घोषणा केली होती. ती म्हणजे, या दुसऱ्या पार्टनंतर आणखी 3 पार्ट येणार आहेत. अकरा वर्षापूर्वी घोषणा केल्यानंतर कॅमेरुन यांनी या वर्षी दुसरा पार्ट रिलीज केला, पण येणाऱ्या पार्टसाठी चाहत्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही.
2028 पर्यंत सर्व पार्ट्स रिलीज होणार
'अवतार 2' शुक्रवार म्हणजेच 16 डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. यानंतर चित्रपटाचे आणखी 3 पार्ट्स रिलीज होणार असून, शेवटचा पार्ट 2028 मध्ये रिलीज होईल. मिळालेल्या माहितीनुसार, 'अवतार 3' ( 20 डिसेंबर 2024), 'अवतार 4' (18 डिसेंबर, 2026) आणि शेवटचा पार्ट 'अवतार 4', 22 डिसेंबर, 2028 ला रिलीज होईल.