'Avatar 2' साठी तिकीट बुकींग सुरू, २४ तास दाखवणार सिनेमा; रात्री १२ ला पहिला शो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 05:18 PM2022-11-22T17:18:02+5:302022-11-22T17:19:29+5:30

हॉलिवूडमध्ये सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेल्या 'अवतार'ने २००९ साली ऑस्करही जिंकला होता.

Avatar The Way Of Water Advance Booking Start In India, Running First show at 12 pm | 'Avatar 2' साठी तिकीट बुकींग सुरू, २४ तास दाखवणार सिनेमा; रात्री १२ ला पहिला शो

'Avatar 2' साठी तिकीट बुकींग सुरू, २४ तास दाखवणार सिनेमा; रात्री १२ ला पहिला शो

googlenewsNext

मुंबई - हॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक, 'अवतार: द वे ऑफ वॉटर' लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जेम्स कॅमेरून दिग्दर्शित या चित्रपटाची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतिक्षा होती. त्याचवेळी, आता 'Avatar 2' च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आजपासून संपूर्ण भारतात चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू झाली असून चित्रपटाचा नवा ट्रेलरही रिलीज झाला आहे. जो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

हॉलिवूडमध्ये सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेल्या 'अवतार'ने २००९ साली ऑस्करही जिंकला होता. जेम्स कॅमरूनच्या 'अवतार: द वे ऑफ वॉटर' या चित्रपटाची चाहत्यांनी गेल्या १३ वर्षांपासून वाट पाहिली आहे. 'अवतार 2' च्या आगाऊ बुकिंगसोबतच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलरही लाँच करण्यात आला आहे. आदल्या दिवशी 'अवतार 2' च्या कॅरेक्टरचे वेगवेगळे पोस्टर्स देखील प्रदर्शित करण्यात आले.

अवतार: द वे ऑफ वॉटर १६ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे आणि त्याची आगाऊ बुकिंग आज देशभरात सुरू झाली आहे. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, मल्याळम, तामिळ, कन्नड आणि तेलगू भाषेत रिलीज होणार आहे. हा चित्रपट २४ तास देशभरातील निवडक सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित केला जाईल, ज्याचा पहिला शो मध्यरात्री १२ वाजता सुरू होईल. 'अवतार 2' चे दिग्दर्शन जेम्स कॅमेरून यांनी केले आहे आणि 20th Studio नं त्याची निर्मिती केली आहे. 

अवतार फ्रेंचायझीचा पहिला चित्रपट २००९ मध्ये आला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. यावेळी 'टायटॅनिक' फेम केट विन्सलेट, क्लिफ कर्टिससह इतर अनेक स्टार्सही या चित्रपटात दिसणार आहेत. हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. अगदी या चित्रपटानं  ‘टायटॅनिक’लाही मागे टाकलं होतं. अवघ्या सहा आठवड्यांत ‘अवतार’नं  १ अब्ज ८५ डॉलरची कमाई केली होती. ‘अवतार’ला दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले होते. हा चित्रपट २३ कोटी डॉलरच्या बजेटमध्ये बनवला गेला होता, ज्याला तेव्हाचा सर्वात महागडा चित्रपट म्हटलं गेलं होतं.

आणखीही पार्ट येणार...
‘अवतार’चं शूटिंग सप्टेंबर २०२० मध्ये पूर्ण झालं. त्याचबरोबर ‘अवतार ३’चं शूटिंगही जवळपास संपलं आहे. ‘अवतार २’ हा १६ डिसेंबर २०२२ रोजी रिलीज होतोय. ‘अवतार ३’साठी २० डिसेंबर २०२४ चा स्लॉट निश्चित करण्यात आला आहे. यानंतर ‘अवतार ४’ डिसेंबर २०२६ आणि ‘अवतार ५’ डिसेंबर २०२८ ला रिलीज होण्याची अपेक्षा आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Avatar The Way Of Water Advance Booking Start In India, Running First show at 12 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.