Avatar The Way of Water Trailer: नादखुळा...! ‘अवतार- द वे ऑफ वॉटर’चा नवा ट्रेलर पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 03:26 PM2022-11-03T15:26:56+5:302022-11-03T15:27:27+5:30
Avatar: The Way of Water Second Trailer : ‘अवतार- द वे ऑफ वॉटर’चा नवा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा ट्रेलरही शानदार आहे. यातील व्हिएफएक्स इफेक्ट्स खिळवून ठेवतात.
Avatar The Way of Water Trailer: 2009 साली रिलीज झालेल्या जेम्स कॅमरून यांच्या ‘अवतार’ या सिनेमाने जगभर धुमाकूळ घातला आहे. या अभूतपूर्व सिनेमानं सर्वांना खिळवून ठेवलं होतं. सर्वाधिक कमाईचा इतिहास रचला होता. आता तब्बल 13 वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वल अर्थात दुसरा भाग ‘अवतार- द वे ऑफ वॉटर’ येतोय. तूर्तास काय तर ‘अवतार- द वे ऑफ वॉटर’चा नवा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा ट्रेलरही शानदार आहे. ट्रेलरमध्ये पेंडोराचं सुंदर जग दिसतं. यातील व्हिएफएक्स इफेक्ट्स खिळवून ठेवतात.
‘अवतार- द वे ऑफ वॉटर’ ची कथा 2009मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अवतार’चा पुढचा भाग असणार आहे. या कथेची हलकीशी झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. सली परिवाराच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर सली कुटुंब कशापद्धतीने मात करेल, हे सेकंड पार्टमधून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
‘अवतार- द वे ऑफ वॉटर’ हा सिनेमा येत्या 16 डिसेंबरला रिलीज होतोय. खास गोष्ट म्हणजे हा सिनेमा एक-दोन नाही तर जगभरातील तब्बल 160 भाषांमध्ये प्रदर्शित होतोय. भारतीय प्रेक्षक इंग्रजीशिवाय हिंदी, तामिळ, तेलगू व मल्याळम या भाषेत हा सिनेमा प्रेक्षक बघू शकतील.
2009 मध्ये ‘अवतार’ रिलीज झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अगदी या चित्रपटानं ‘टायटॅनिक’लाही मागे टाकलं होतं. अवघ्या सहा आठवड्यांत ‘अवतार’नं 1 अब्ज 85 डॉलरची कमाई केली होती. ‘अवतार’ला दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले होते. ऑस्करसाठी देखील या चित्रपटाला नामांकन मिळालं आहे. हा चित्रपट 23 कोटी डॉलरच्या बजेटमध्ये बनवला गेला होता, ज्याला तेव्हाचा सर्वात महागडा चित्रपट म्हटलं गेलं होतं.
आणखीही पार्ट येणार...
‘अवतार’चं शूटिंग सप्टेंबर 2020 मध्ये पूर्ण झालं. त्याचबरोबर ‘अवतार 3’चं शूटिंगही जवळपास संपलं आहे. ‘अवतार 2’ हा 16 डिसेंबर 2022 रोजी रिलीज होतोय. ‘अवतार 3’साठी 20 डिसेंबर 2024 चा स्लॉट निश्चित करण्यात आला आहे. यानंतर ‘अवतार 4’ डिसेंबर 2026 आणि ‘अवतार 5’ डिसेंबर 2028 ला रिलीज होण्याची अपेक्षा आहे.