Avatar 2 OTT Release : 'अवतार 2'ची जादू आता घरबसल्या अनुभवा, कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 05:36 PM2023-01-12T17:36:22+5:302023-01-12T17:38:40+5:30
Avatar The Way Of Water OTT Release : होय, जेम्स कॅमेरुन दिग्दर्शित 'अवतार 2' हा हॉलिवूडपट आता ओटीटीवर रिलीज होतोय.
Avatar The Way Of Water OTT Release : 'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. 16 डिसेंबर 2022 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आणि सगळ्यांनाच या सिनेमाने वेड लावलं. केवळ जगातच नाही तर भारतातही या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. आता या सिनेमाची जादू तुम्हाला घरबसल्या अनुभवता येणार आहे. होय, जेम्स कॅमेरुन (James Cameron) दिग्दर्शित 'अवतार 2' हा हॉलिवूडपट आता ओटीटीवर रिलीज होतोय.
मीडिया रिपोर्टनुसार, 'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney + Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो. सिनेमागृहात 45 दिवस पूर्ण केल्यानंतर सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येतो. तूर्तास या चित्रपटाच्या रिलीजला २८ दिवस पूर्ण झाले आहेत. पण अद्याप 'अवतार 2'च्या निर्मात्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.
भारतात 'अवतार 2'ने आत्तापर्यंत ३७९.७५ काेटींची कमाई केली आहे. अद्यापही हा चित्रपट गर्दी खेचतोय. लवकरच 'अवतार 2' भारतीय बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींचा आकडा पार करेल, असा विश्वास जाणकार व्यक्त करत आहेत.
2009 मध्ये ‘अवतार’ रिलीज झाला होता. या चित्रपटाला बॉक्स आफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अगदी या चित्रपटानं ‘टायटॅनिक’लाही मागे टाकलं होतं. अवघ्या सहा आठवड्यांत ‘अवतार’ नं 1 अब्ज 85 डॉलरची कमाई केली होती. ‘अवतार’ ला दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले होते. ऑस्करसाठी देखील या चित्रपटाला नामांकन मिळालं आहे. हा चित्रपट 23 कोटी डॉलरच्या बजेटमध्ये बनवला गेला होता, ज्याला तेव्हाचा सर्वात महागडा चित्रपट म्हटलं गेलं होतं. आता याचा सीक्वल अर्थात ‘अवतार 2’ एकूण किती कमावतो, ते बघूच.