प्रदर्शनाआधी लीक झाला ‘अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’! नेटक-यांनी शेअर केलेत स्क्रीनशॉट्स!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 11:12 AM2019-04-25T11:12:45+5:302019-04-25T11:14:46+5:30

चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या असताना एक शॉकिंग बातमी समोर आली आहे. होय, एकीकडे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे ‘अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’ ऑनलाईन लीक झाल्याचे वृत्त आहे.

Avengers Endgame hollywood movie leaked online on tamil rockers website | प्रदर्शनाआधी लीक झाला ‘अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’! नेटक-यांनी शेअर केलेत स्क्रीनशॉट्स!!

प्रदर्शनाआधी लीक झाला ‘अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’! नेटक-यांनी शेअर केलेत स्क्रीनशॉट्स!!

googlenewsNext
ठळक मुद्देर्तास ‘अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहेत.

अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’ हा बहुप्रतिक्षीत हॉलिवूड चित्रपट उद्या शुक्रवारी रिलीज होतोय.     चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या असताना असताना एक शॉकिंग बातमी समोर आली आहे. होय, एकीकडे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे ‘अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’ ऑनलाईन लीक झाल्याचे वृत्त आहे.
‘अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’ हा चित्रपट तमिळरॉकर्स या वेबसाईटने हा चित्रपट लीक केला आहे. चाहत्यांनी या वेबसाईटवरचे ‘अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’चे अनेक स्क्रिनशॉट्स टिष्ट्वटरवर शेअर केले आहेत. तशीही भारतात तमिळरॉकर्स ही वेबसाईट पायरसीसाठी कुप्रसिद्ध आहे. या वेबसाईटने यापूर्वीही अनेक चित्रपट असेच लीक केले आहेत. काही दिवसांपूर्वी ‘अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’चे काही व्हिडीओ लीक झाले होते. आता तर तामिळ रॉकर्सच्या वेबसाईटवर अख्खा चित्रपट उपलब्ध आहे.




 काही दिवसांपूर्वीच चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट लीक करु नका अशी विनंती केली होती. परंतु त्याचा फारसा परिणाम झाला नाही, हेच यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गत वर्षी मद्रास हायकोर्टाने ३७ इंटरनेट सेवा पुरवणा-या कंपनीला १२ हजार वेबसाईट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. यात  तमिळरॉकर्स  वेबसाईटच्या २ हजार मायक्रोसाइट्चादेखील समावेश होता. तामिळरॉकर्स वेबसाईट ब्लॉक केल्यानंतर तिच्याच हजारो मायक्रोसाइट्स सक्रिय झाल्या आणि यातून चित्रपट लीक व्हायला सुरूवात झाली. गतवर्षी ही वेबसाईट चालवणा-या काही जणांना अटक झाली होती. पण तरिही या वेबसाईटवरून चित्रपट लीक होणे थांबलेले नाही. 




तूर्तास ‘अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहेत. भारताही चित्रपटाची जबरदस्त क्रेज आहे. इतकी की, दर सेकंदाला  १८   तिकीटाची बुकींग सुरू आहे.    

 
 

Web Title: Avengers Endgame hollywood movie leaked online on tamil rockers website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.