​‘एवेंजर्स- इन्फिनिटी वॉर’मध्ये नाही दिसला ‘हा’ सुपरहिरो; आता दिग्दर्शकाला मिळताहेत धमक्या!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 08:03 AM2018-06-14T08:03:31+5:302018-06-14T13:33:31+5:30

भारतात गत २७ एप्रिलला रिलीज झालेला हॉलिवूड चित्रपट ‘एवेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ चांगलाच गाजला. भारतीय प्रेक्षकांनी या चित्रपटाला बरेच डोक्यावर ...

'Avengers-Infinity War' does not look 'ha' superhero; Now the threats to the director are !! | ​‘एवेंजर्स- इन्फिनिटी वॉर’मध्ये नाही दिसला ‘हा’ सुपरहिरो; आता दिग्दर्शकाला मिळताहेत धमक्या!!

​‘एवेंजर्स- इन्फिनिटी वॉर’मध्ये नाही दिसला ‘हा’ सुपरहिरो; आता दिग्दर्शकाला मिळताहेत धमक्या!!

googlenewsNext
रतात गत २७ एप्रिलला रिलीज झालेला हॉलिवूड चित्रपट ‘एवेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ चांगलाच गाजला. भारतीय प्रेक्षकांनी या चित्रपटाला बरेच डोक्यावर घेतले. अर्थात चित्रपटाच्या क्लायमॅक्सने अनेकांची निराशा केली. पण तरिही येथील बॉक्सआॅफिसवर या हॉलिवूडपटाने रग्गड कमाई केली. ‘एवेंजर्स’ सीरिजचे एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे, यात मार्व्हल चित्रपटांच्या सर्वच्या सर्व सुपरहिरोजला एकत्र आणले जाते. ‘एवेंजर्स- इन्फिनिटी वॉर’मध्येही एक वगळता सगळे सुपरहिरोज होते. होय, एक सुपरहिरो या चित्रपटात नव्हता. तो म्हणजे, धनुष्यबाण चालवणारा हॉकी. हॉकीला या चित्रपटात सामील केले गेले नव्हते. निश्चितपणे हा दिग्दर्शकाचा निर्णय होता. पण आता हाच निर्णय दिग्दर्शकांना भारी पडताना दिसतोय. होय, ‘एवेंजर्स- इन्फिनिटी वॉर’मध्ये हॉकीला  सामील न करण्याचा निर्णय हॉकीच्या चाहत्यांना अजिबात रूचलेला नाही. याबद्दल हॉकीच्या चाहत्यांनी ‘एवेंजर्स- इन्फिनिटी वॉर’च्या दिग्दर्शकांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आयबी टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हॉकीची भूमिका साकारणारा अभिनेता जेरिमी रेनर याने याबद्दल माफी मागितली आहे. ‘रूसो ब्रदर्स (दिग्दर्शक अँथोनी व जो) यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. हा वेडेपणा आहे. मी माफी मागतो,’ असे त्याने म्हटले आहे.
‘एवेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ आतापर्यंतचा सर्वात मोठा सुपरहिरो असलेला चित्रपट आहे. त्यात मार्व्हलचे आतापर्यंतचे गेल्या एक दशकात आलेल्या १८ चित्रपटांचे सुमारे ७६ पात्र आहेत. त्यापैकी २० पेक्षा जास्त सुपरहिरो आहेत. चित्रपटाचा शेवट अत्यंत नाट्यमय आहे. यातील सस्पेन्स म्हणजे चित्रपट इतिहासातील सर्वाधिक शक्तिशाली मानल्या जाणा-्या थानोस या खलनायकाला कोण मारेल? हा आहे.
भारतात ‘एवेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ सुमारे २००० स्क्रिन्सवर रिलीज झाला होता. तुलनात्मकदृष्ट्या बघितले असता, यंदाच्या बॉलिवूडच्या सगळे टॉप ओपनर्स आणि ब्लॉकबस्टर चित्रपट २००० पेक्षा अधिक स्क्रिन्सवर रिलीज झाले होते. प्रिव्यू शोजमधून ‘एवेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ने मोठी कमाई केली. प्रिव्यू शोच्या बाबतीत हा सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट बनला आहे.

Web Title: 'Avengers-Infinity War' does not look 'ha' superhero; Now the threats to the director are !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.