बेनेडिक्ट कम्बरबॅचला चढली ’६०ची नशा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2016 02:34 PM2016-10-21T14:34:18+5:302016-10-21T14:34:50+5:30
ब्रिटिश अभिनेता बेनेडिक्ट कम्बरबॅचला सध्या साठव्या दशकातील ‘फ्री संस्कृती’ची नशा चढली आहे. आगामी मार्व्हल सुपरहीरो मुव्ही ‘डॉ. स्ट्रेंज’मध्ये प्रमुख ...
ब रिटिश अभिनेता बेनेडिक्ट कम्बरबॅचला सध्या साठव्या दशकातील ‘फ्री संस्कृती’ची नशा चढली आहे. आगामी मार्व्हल सुपरहीरो मुव्ही ‘डॉ. स्ट्रेंज’मध्ये प्रमुख भूमिका साकारणारा बेनेडिक्ट सांगतो की, ‘मला साठच्या दशकातील प्रायोगिक ड्रग्सचा असणार सुळसुळाट आणि त्यासंबंधी निगडित इतिहासात खूप रुची आहे. किंबाहुना मला तो काळ आकर्षित करतो.’
चित्रपट स्वीकारण्याचे कारण सांगताना तो म्हणाला की, तो काळच वेगळा होता. सायकेडेलिक्स, स्पिरिच्युअलिज्म, पंथवादाचा तो काळा होता. कुठल्या तरी कल्टला फॉलो करण्याकडे लोकांचा ओढा होता. ते लोक खूप प्रयोगशील होते. अज्ञात गोष्टींचा अनुभव घेण्यास ते कचरत नसत. यामुळेच मी या चित्रपटाला होकार दिला.
४० वर्षीय बेनेडिक्टला वाटते की, अशा प्रकारच्या भूमिका करण्याचे आव्हान स्वीकारण्याचे हेच खरे वय आहे. मी कोणतेही गोष्टी स्वत:हून करू पाहतो आणि ती जाणून घेतो. आयुष्य आणि विश्व या दोन्ही गोष्टी फार किचकट आणि गुंतागुंतीच्या आहेत. हा तिढा सोडविण्याकरिता प्रयत्न मी अशा वैविध्यपूर्ण भूमिकांतून करतोय.