BIOPIC TREND: ऐतिहासिक व्यक्तींसारखे तंतोतंत दिसणारे २३ अभिनेते
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2017 12:24 PM2017-02-13T12:24:37+5:302017-02-13T17:54:37+5:30
सध्या बॉलीवूडमध्ये ‘बायोपिक’चा ट्रेंड आला आहे. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपटात काम करण्यासाठी ए-लिस्ट कलाकारदेखील उत्सुक दिसत आहेत; ...
स ्या बॉलीवूडमध्ये ‘बायोपिक’चा ट्रेंड आला आहे. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपटात काम करण्यासाठी ए-लिस्ट कलाकारदेखील उत्सुक दिसत आहेत; परंतु बॉलीवूडमध्ये अजूनही बायोपिक आणि काल्पनिक पात्र या मधला फरक माहीत नाही असेच वाटते. ‘बायोपिक’च्या नावाखाली ढळढळ काल्पनिक वाटावेत असे चित्रपट बनवले जात आहेत.
कथा तर सोडाच एखाद्याच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवीत असताना कलाकार निवडण्यातही निर्माते-दिग्दर्शक कमी पडताना दिसतात. लोकप्रिय व्यक्तींच्या बायोपिकमध्ये कलाकार निवडताना तो किमान स्वरूपात का होईना; पण त्या व्यक्तीशी दिसण्यात साम्य असणारा हवा एवढी माफक अपेक्षा प्रेक्षकांची असते. आता समजा त्या व्यक्तीचा चेहरा फारसा प्रचलित नसेल तेव्हा ठीक आहे; मात्र, मेरी कोमसारख्या सर्वांनी पाहिलेल्या व्यक्तीच्या बायोपिकमध्ये प्रियंका चोप्राची निवड करणे मुळीच पटण्यासारखे नाही.
दाऊदची बहीण हसीनाच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे नुकतेच पहिले पोस्टर लाँच करण्यात आले. त्यामध्ये श्रद्धा कपूरला हसीनासारखे दाखविण्यासाठी बरीच मेहनत घेण्यात आली. मात्र, ती पुरेशी ठरत नाही. तिच्या जागी सुप्रिया पाठक यांची निवड अधिक योग्य वाटली असती. संजय दत्तच्या भूमिकेत रणबीर कपूरची कल्पना करणेसुद्धा अवघड वाटते. तीच गोष्ट इम्रान हाश्मीने मोहंमद अझरुद्दीनची भूमिका करताना दिसली.
हसीना आणि श्रद्धा कपूर
हसीना आणि सुप्रिया पाठक
बरं केवळ दिसणेच महत्त्वाचे नसते. त्या भूमिकेला आतून जगणेसुद्धा खूप महत्त्वाचे असते. आमिर खान जरी महावीर फोगाट यांच्यासारखा दिसत नसला तरी त्याने ती भूमिका अक्षरश: जगली आहे (बरं किती जणांनी ‘दंगल’च्या आधी महावीर यांना पाहिले होते?). बॉलीवूड जसे हॉलीवूडच्या चित्रपटांतून ‘प्रेरणा’ घेत असते, तशीच ‘प्रेरणा’ बायोपिक बनवतानादेखील घेतली पाहिजे. अशाच काही अभिनेत्यांचे उदाहरणे आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत जे ते साकारत असलेल्या व्यक्तींशी तंतोतंत दिसले.
* जेमी फॉक्स - रे
जेमी फॉक्स या गुणी अभिनेत्याने २००४ साली ‘रे’ या चित्रपटात रे चार्ल्स या अंध जॅझ संगीतकाराची भूमिका केली होती. त्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आॅस्कर पुरस्कारही मिळाला.
* डॅनियल डे लुईस - लिंकन
सिने इतिहासातील सर्वोत्तम अभिनेता म्हणून डॅनियल डे लुईसला ओळखले जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या जीवनावर आधारित ‘लिंकन’ या स्टिव्हन स्पीलबर्ग दिग्दर्शित सिनेमात तो लिंकनशी एवढा मिळताजुळता दिसला की, असे वाटते लिंकन खरेचं असे असतील. त्यालाही बेस्ट अॅक्टरचा आॅस्क र मिळाला होता हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
* रॉबर्ट डाऊनी ज्युनियर - चॅप्लिन
‘आयर्न मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रॉबर्ट डाऊनी ज्युनियरने ‘चॅप्लिन’ नावाच्या विनोदाचा बादशाह चाली चॅप्लिनची देहबोली अशी काही अंगीकारली की खरा कोण आणि कलाकार कोण असा फरक करणे अवघड जावे.
* बेन किंग्सले- गांधी
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भूमिका केवळ भारतीय माणूस करू शकतो हा गैरसमज खोडून काढत बेन किंग्सलेने गांधीजी असे साकारले की आश्चर्याने बघतच राहिल्याशिवाय पर्यायच उरत नाही. त्यांनाही बेस्ट अॅक्टरचा आॅस्कर मिळाला होता.
* अॅश्टन कुचर - जॉब्स
अॅपल कंपनीचा बॉस स्टीव्ह जॉब्सचा बायोपिक ‘जॉब्स’मध्ये अॅश्टन कुचरने त्याची भूमिका केली होती. विनोदी व हलकेफुलके रोल करण्यासाठी प्रसिद्ध असणारा अॅश्टनने जॉब्सचे बेअरिंग एकदम परफेक्ट पकडले होते.
* मॉर्गन फ्रीमन - इनव्हिक्टस्
या यादीमध्ये मॉर्गन फ्रीमन यांचे नाव नसेल असे कसे होऊ शकते. द. आफ्रि केचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या जीवनावर जेव्हा क्लिंट इस्टवूडने चित्रपट बनवायला घेतला तेव्हा मॉर्गन फ्रीमनशिवाय ही भूमिका दुसरे कोणीच करू शकत नाही, असे प्रेक्षकांचेच मत होते. फोटोवरून ते सिद्धही होते.
* हेलन मिरेन - द क्वीन
इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची भूमिका हेलन मिरेन या अभिनेत्रीने साकारली होती. दोघींच्या चेहऱ्यातील साम्यता आश्चर्यचकित करणारी आहे.
* सलमा हायेक - फ्रीडा
स्पॅनिश चित्रकार फ्रीडा काहलो हिच्या जीवनावर बेतलेल्या ‘फ्रीडा’ (२००२) या सिनेमात सलमा हायेक हिने प्रमुख भूमिका केली होती. तिच्या जबरदस्त अभिनयाने या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते.
* शॉन पेन- मिल्क
अमेरिकेतील पहिले समलैंगिक मेयर हार्वी मिल्क यांची भूमिका शॉन पेन याने ‘मिल्क’मध्ये (२००८) साकारली होती. त्यासाठी त्याने ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आॅस्कर’ पुरस्कार पटकावला होता. शॉन पेनचा हा तिसरा आॅस्कर ठरला.
* एडी रेडमेन - द थेअरी आॅफ एव्हरीथिंग
प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टिव्हन हॉकिंग यांची भूमिका करणे सोपी गोष्ट नव्हती; परंतु हे आव्हान एडी रेडमेन या अभिनेत्याने लीलया पार केले. त्यांच्यासारखे बोलणे, वागणे, राहणीमान, दिसणे अशा सर्वच बाबतीत त्याने कमाल केली. म्हणून तर तो बेस्ट अॅक्टर आॅस्करचा मानकरी ठरला.
* फिलिप सेमोर हॉफमन- कपोट
प्रसिद्ध अमेरिकन लेखक ट्रुमन कपोट यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात दिवंगत अभिनेते फिलिप सेमोर हॉफन यांनी प्रमुख भूमिका केली होती. बेनेट मिलर दिग्दर्शित या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेता म्हणून आॅस्कर पुरस्कार मिळाला होता.
आणखी काही उदाहरणे:
* मिशेल विल्यम्स - मर्लिन मुनरोच्या भूमिकेत
* नटाएली पोर्टमन - जॅकलिन केनडी ओनासिस
* मेरियन कोटिलार्ड - एडिथ पियाफच्या भूमिकेत
* अँथनी हॉपकिन्स - अल्फे्रड हिचकॉकच्या भूमिकेत
* गॅरी ओल्डमन आणि क्लो वेब - सीड विशियस आणि नॅन्सी स्पंजनच्या भूमिकेत
* मेरिल स्ट्रीप - मार्गेरेट थॅचरच्या भूमिकेत
* एड्रिएन ब्रॉडी - सल्वॉदर दालीच्या भूमिकेत
* जेनिफर लोपेझ- सेलिना क्विटेनिलाच्या भूमिकेत
* अँड्रे ३००० - जिमी हेन्ड्रिक्सच्या भूमिकेत
* डेन्झल वॉशिंग्टन - माल्कम एक्सच्या भूमिकेत
* ब्रुनो गँझ - अडोल्फ हिटलरच्या भूमिकेत
* वॅल किल्मर - जीम मॉरिसनच्या भूमिकेत