BIRTHDAY SPECIAL: जेनिफर अॅनिस्टनबद्दल १२ इंटरेस्टिंग फॅक्ट्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2017 07:23 AM2017-02-11T07:23:15+5:302017-02-11T12:57:17+5:30
‘फ्रेंड्स’ मालिकेतून संपूर्ण जगाला ‘फॅन’ बनवलेल्या जेनिफर अॅनिस्टनचा आज वाढदिवस. केवळ ‘फ्रेंड्स’ मालिकेतील रेचल ग्रीन एवढीच तिची ओळख नाही. ...
‘ ्रेंड्स’ मालिकेतून संपूर्ण जगाला ‘फॅन’ बनवलेल्या जेनिफर अॅनिस्टनचा आज वाढदिवस. केवळ ‘फ्रेंड्स’ मालिकेतील रेचल ग्रीन एवढीच तिची ओळख नाही. हॉलीवूडमधील एक सशक्त अभिनेत्री म्हणून ती आज ओळखली जाते. रोमॅण्टिक-कॉमेडी चित्रपटांबरोबरच तिच्या गंभीर अभिनयाचीसुद्धा खूप चर्चा होत असते.
पण तुमच्या या लाडक्या अभिनेत्रीविषयी तुम्ही किती जाणता? तिच्या ४८व्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्याविषयी काही रंजक माहिती सांगणार आहोत.
तत्पूर्वी ‘सीएनएक्स मस्ती’कडून तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
१. जेनिफरच्या आईवडिलांचे नाव जॉन अनिस्टन आणि नॅन्सी डोव आहे.
२. वयाच्या ११व्या वर्षीच तिच्या एका पेंटिंगचा ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम आॅफ आर्ट’मध्ये भरलेल्या प्रदर्शनात समावेश करण्यात आला होता.
३. जेनिफरने अभिनेत्री होण्याआधी रेस्टॉरंट्समध्ये वेटर, टेलीमार्केटिअर, बाईक मेसेंजर म्हणून काम केलेले आहे.
४. विशीमध्ये तिला ‘डिसलेक्सिया’ असल्याचे निदान झाले.
५. ‘मॉली’ (१९९०) या मालिकेत तिने सर्वप्रथम अभिनेत्री म्हणून काम केले. त्याच मालिकेत मेईम बैलिक ही अभिनेत्रीसुद्धा होती. मेईम सध्या ‘द बिग बँग थेअरी’ मालिकेत डॉ. एमी ही भूमिका करते.
६. जेनिफरने ‘लेप्रिचौन’ (१९९३) या हॉरर फिल्ममधून मोठ्या पडद्यावर आगमन केले.
७. ‘फ्रेंड्स’ मालिकेसाठी तिने ‘सॅटर्डे नाईट लाईव्ह’ या शोमधील भूमिका नाकारली होती.
८. १९९५ साली जेनिफर आणि तिचा ‘फ्रेंड्स’ को-स्टार मॅथ्यू पेरी या दोघांनी मायक्रोसॉफ्टच्या ‘विन्डोेज ९५’ आॅपरेटिंग सिस्टिमसाठी बनवलेल्या एका तासाच्या इन्स्ट्रक्शनल व्हिडिओमध्ये काम केले होते.
९. जगप्रसिद्ध चॅट शो ‘द एलेन डिजेनरस शो’च्या पहिल्या एपिसोडमध्ये जेनिफर अॅनिस्टन पहिली गेस्ट होती.
१०. तिने अँड्रिया बुचाननसोबत मिळून ‘रुम १०’ (२००६) नावाच्या एका शॉर्ट फिल्मचे सहदिग्दर्शन केले होते.
११. तिला हवेत उडण्याचा आणि पाण्याखाली जाण्याची भीती वाटते.
१२. ‘फ्रेंड्स’ मालिकेतील जोई आणि चँडलरचा तो पांढºया कुत्र्याचा सिरेमिक पुतळा जेनिफरच्या मालकिचा आहे.
►ALSO READ: अबब...जेनिफर अॅनिस्टने घातला तीन लाखांचा ड्रेस!
►ALSO READ: जेनिफर अॅनिस्टन पुन्हा दिसणार का टीव्हीवर?