या तीन कारणांमुळे भारतात पोर्न चित्रपटांना म्हटले जाते ब्लू फिल्म!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 01:05 PM2018-02-09T13:05:06+5:302018-02-09T18:35:06+5:30

पोर्न साइट्सवर सर्वाधिक ट्रॅफिक भारतीयांची असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून समोर आले. पण भारतात याविषयी बोलणे टॅबू समजले जाते. पोर्न ...

Blue Film in India due to these three reasons !! | या तीन कारणांमुळे भारतात पोर्न चित्रपटांना म्हटले जाते ब्लू फिल्म!!

या तीन कारणांमुळे भारतात पोर्न चित्रपटांना म्हटले जाते ब्लू फिल्म!!

googlenewsNext
र्न साइट्सवर सर्वाधिक ट्रॅफिक भारतीयांची असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून समोर आले. पण भारतात याविषयी बोलणे टॅबू समजले जाते. पोर्न मुव्हिजला आपल्याकडे ‘ब्लू फिल्म’ असे म्हटले जाते. पण असे म्हणण्यामागचे नेमके कारण काय? असा कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल. यामागे तीन प्रमुख कारणे आहेत. ज्यामुळे पोर्न चित्रपटांना ब्लू फिल्म असे म्हटले जाते. 

सुरुवातीला पोर्न इंडस्ट्रीमध्ये चित्रपटांचे बजेट खूपच कमी असायचे. त्यामुळे दिग्दर्शकांनी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट रीलला कलरमध्ये दाखविण्यासाठी खूपच सोपे आणि स्वस्त फंडे आजमावले. त्यातीलच एक फंडा म्हणजे चित्रपटाच्या प्रिंटवर ब्लू प्रिंट नोटीस असायचे. कदाचित यामुळेच या चित्रपटांना ब्लू फिल्म्स असे म्हटले जात असेल. त्याचबरोबर ज्या थिएटर्समध्ये बी ग्रेड चित्रपट दाखविले जात होते, तेथील पोस्टर्सही नेहमीच ब्लू असायचे. असे म्हटले जाते की, हा रंग खूप आकर्षित करतो त्यामुळेच या चित्रपटांना ब्लू फिल्म्स म्हटले जात असेल. 



५० ते ६० वर्षांपूर्वी बºयाचशा राज्यांमध्ये ब्लू लॉ म्हणजेच ब्लू कायदा होता. या कायद्यानुसार रविवारच्या दिवशी बरेचसे व्यवसाय करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे रविवारी ब्लू मुव्हीजदेखील दाखविल्या जात नसत. त्यामुळे बी ग्रेड चित्रपटांना यामुळेदेखील ब्लू फिल्म म्हटले जात असावे. 



सुरुवातीच्या दिवसांमध्ये व्हीसीआरचा ट्रेंड असायचा. त्यावेळी व्हिडीओ स्टोर्स नॉर्मल व्हीसीआरच्या कॅसेट्स साध्या पॉलिथिनमध्ये देत असत. मात्र पोर्न चित्रपटांसाठी निळ्या रंगाचे पॉलिथिन वापरले जात असे. जेणेकरून रंगावरून ब्लू फिल्मची कॅसेट्स असल्याचे समजून यावे. 

Web Title: Blue Film in India due to these three reasons !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.