स्टेजवर गाणं गातानाच सिंगरचा मृत्यू, भिजलेल्या चाहत्याने मिठी मारली अन्...; लाइव्ह शोमध्ये नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 05:23 PM2024-07-21T17:23:52+5:302024-07-21T17:25:56+5:30

लाइव्ह शो दरम्यान गाण गाताना एका सिंगरचा मृत्यू झाला आहे. भिजलेल्या चाहत्याने मिठी मारल्यामुळे ३५ वर्षीय गायकाला त्याचे प्राण गमवावे लागले आहेत. लाइव्ह शो दरम्यान ही घटना घडली आहे.

brazilian singer ayres Sasaki dies while performing on stage after drentch fan hug him | स्टेजवर गाणं गातानाच सिंगरचा मृत्यू, भिजलेल्या चाहत्याने मिठी मारली अन्...; लाइव्ह शोमध्ये नेमकं काय घडलं?

स्टेजवर गाणं गातानाच सिंगरचा मृत्यू, भिजलेल्या चाहत्याने मिठी मारली अन्...; लाइव्ह शोमध्ये नेमकं काय घडलं?

सिनेविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. लाइव्ह शो दरम्यान गाण गाताना एका सिंगरचा मृत्यू झाला आहे. भिजलेल्या चाहत्याने मिठी मारल्यामुळे ३५ वर्षीय गायकाला त्याचे प्राण गमवावे लागले आहेत. ही घटना ब्राझीलमध्ये घडली असून आयरेस सासाकी असं मृत पावलेल्या गायकाचं नाव आहे. लाइव्ह शो दरम्यान नेमकं काय घडलं? ते जाणून घेऊया. 

३५ वर्षीय आयरेस सासाकी सॅलिनोपोलीस येथील सोलर हॉटेलमध्ये परफॉर्म करत होते. 'द मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा स्टेजवर सासाकी परफॉर्म करत होते. तेव्हा एक भिजलेला चाहता त्यांना मिठी मारण्यासाठी स्टेजवर गेला. जेव्हा हा चाहता सासाकी यांना मिठी मारण्यासाठी जात होता तेव्हा स्टेजवरील वायरमधून विजेचा करंट लागला आणि यातच सासाकी यांचाही मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणानंतर चाहत्यांनाही धक्का बसला आहे. गायकाला भेटण्यासाठी चाहता भिजलेल्या अवस्थेत का पोहोचला? याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नसून पोलीस याचा तपास करत आहेत. 

सासाकी यांच्या या लाइव्ह शोमध्ये त्यांची काकीदेखील उपस्थित होती. घडलेल्या प्रकारानंतर सासाकी यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. "ठरवलेल्या वेळेपेक्षा जास्त हा शो सुरू होता. त्यावेळी जे लोक त्याच्याबरोबर होते, त्यांच्याशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. हे सगळं कसं घडलं, याबाबत जाणून घेतल्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ", असं सासाकी यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे. काहीच महिन्यांपूर्वी सासाकी यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या निधनाच्या बातमीने पत्नीची वाईट अवस्था झाली आहे. चाहते त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. 

Web Title: brazilian singer ayres Sasaki dies while performing on stage after drentch fan hug him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.