ब्रिटिश गायक एड शीरन चेन्नईत दाखल, ए आर रहमानची घेतली भेट; शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:14 IST2025-02-05T16:13:41+5:302025-02-05T16:14:23+5:30

'परफेक्ट' फेम गायक एड शीरनची चेन्नईत धमाल

British singer Ed Sheeran arrives in Chennai met a r rahman shares video | ब्रिटिश गायक एड शीरन चेन्नईत दाखल, ए आर रहमानची घेतली भेट; शेअर केला व्हिडिओ

ब्रिटिश गायक एड शीरन चेन्नईत दाखल, ए आर रहमानची घेतली भेट; शेअर केला व्हिडिओ

ब्रिटीश गायक एड शीरनचे (Ed Sheeran) असंख्य चाहते आहेत. फक्त परदेशातच नाही  तर भारतातही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. एड शीरनची भारतात लवकरच कॉन्सर्ट होणार आहे. चेन्नईत वायएमसीए ग्राऊंडवर पहिली कॉन्सर्ट आहे. यासाठी एड शीरन चेन्नईत दाखल झाला आहे. दरम्यान एड शीरनने चेन्नई संगीतकार ए आर रहमानची भेट घेतली आहे. रहमानचा मुलगा अमीनने इन्स्टाग्रामवर या भेटीचा फोटो शेअर केला आहे.

रहमानचा मुलगा अमीनने मंगळवारी इन्स्टाग्रामवर एड शीरनसोबत फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत तो एड सोबत पोज देत आहे. एड शीरन रहमानच्या चेन्नईतील स्टुडिओत आला आहे. रहमान कम्प्युटरवर काहीतरी दाखवत असताना एड त्याचा फोटो काढत आहे. 


एड शीरननेही इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. रहमानच्या केएम कॉलेज ऑफ म्युझिक अँड टेक्नॉलॉजी च्या विद्यार्थ्यांसोबत तो 'परफेक्ट' गाणं गाताना दिसत आहे. यासोबत एडने लिहिले, 'आज चेन्नईमध्ये उत्कृष्ट गायकांच्या टोळीसोबत गाणं गायलं.'




एड काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्येही होता. हैदराबाद शहर फिरण्याचा आनंद घेतला. तर आता चेन्नईतही तो मजा करत आहे. एका व्यक्तीकडून मालिश करुन घेतानाचाही व्हिडिओ त्याने शेअर केला. १५ फेब्रुवारीला एडची दिल्लीत कॉन्सर्ट होणार आहे. यासोबतच त्याची ही भारत टूर संपणार आहे.

Web Title: British singer Ed Sheeran arrives in Chennai met a r rahman shares video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.