Actress Miscarriage: महिनाभराआधीच दिली होती अभिनेत्रीने गुड न्यूज, आता झालं मिसकॅरेज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 05:42 PM2022-05-16T17:42:13+5:302022-05-16T17:44:19+5:30
Britney Spears Miscarriage: त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, हे आमच्यासाठी फारच वेदनादायी आहे. आम्हाला घोषणा करावी लागतेय की, आम्ही गर्भावस्थेतच आमच्या बाळाला गमावलं.
Britney Spears Miscarriage: पॉप सिंगर ब्रिटनी स्पीअर्स (Britney Spears) आणि तिचा पार्टनर सॅम असगरी (Sam Asgari) ने जगभरातील आपल्या फॅन्ससाठी मिसकॅरेजची वाईट बातमी शेअर केली आहे. असं असलं तरी ते म्हणाले की, ते फॅमिली प्लानिंगचा प्रयत्न सुरूच ठेवतील. या कपलने इन्स्टाग्रामवरून गुड न्यूज दिली होती.
त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, हे आमच्यासाठी फारच वेदनादायी आहे. आम्हाला घोषणा करावी लागतेय की, आम्ही गर्भावस्थेतच आमच्या बाळाला गमावलं. हा क्षण कोणत्याही आई-वडिलांसाठी वाईट क्षण असतो. कदाचित आम्ही गुड न्यूजची घोषणा करण्यात जास्त घाई केली.
कपलने लिहिलं की, 'आम्ही आनंदाची बातमी शेअर करण्यासाठी फार उत्सुक होतो. एकमेकांसाठी आमचं प्रेम आमची ताकद आहे. आम्ही आमच्या सुंदर परिवाराचा विस्तार करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार'.
तिने लिहिलं की, 'आम्ही तुमच्या सर्व समर्थनासाठी आभारी आहोत. या कठीण काळात आम्ही प्रायव्हसीची मागणी करतो'.
अनेक सेलिब्रिटींनी दोघांना समर्थन दर्शवलं. विशेष करून पेरिस हिल्टनने कमेंट केली की, तुमच्या नुकसानासाठी वाईट वाटलं. तुम्हाला खूप प्रेम. दरम्यान प्रसिद्ध गायिका ब्रिटनीने ११ एप्रिलला आपल्या प्रेग्नेन्सीबाबत बातमी शेअर केली होती. ज्यामुळे फॅन्सही आनंदी झाले होते.