Bruce Willis: हॉलिवूड सुपरस्टार Bruce Willisने केली निवृत्तीची घोषणा, 'या' आजाराने त्रस्त होऊन घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 17:15 IST2022-03-31T17:14:49+5:302022-03-31T17:15:04+5:30
Bruce Willis: ब्रूस विलिस दीर्घकाळापासून एका गंभीर आजाराशी झुंज देत आहेत, याच कारणामुळे त्यांनी चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबाने अधिकृत निवेदन जारी करुन या आजाराविषयी माहिती दिली.

Bruce Willis: हॉलिवूड सुपरस्टार Bruce Willisने केली निवृत्तीची घोषणा, 'या' आजाराने त्रस्त होऊन घेतला निर्णय
हॉलिवूडचा प्रसिद्ध अॅक्शन हिरो ब्रूस विलिस(Bruce Willis) यांनी अचानकपणे निवृत्तीची घोषणा केली आहे. 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या आणि अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या ब्रूस विलिस यांनी अचानक निवृत्तीची घोषणा केल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 40 वर्षांहून अधिक काळ चित्रपटात काम केलेल्या ब्रूस यांना एका खास आजाराने ग्रासले आहे, ज्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
'या' आजाराने ग्रासले...
ब्रुस विलिस दीर्घकाळापासून एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. याच कारणामुळे त्यांनी चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबाने अधिकृत निवेदन जारी करुन ब्रूस यांच्या आजारपणाविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ब्रूस यांना Aphasia नावाच्या आजाराने ग्रासले आहे.
अशी झाली अभिनयाची सुरुवात
ब्रूस विलिस(67) यांनी 1980 मध्ये आलेली टीव्ही मालिका 'मूनलाइटिंग'मधून अभिनयाची सुरुवात केली. यानंतर त्यांनी 'डाय हार्ड' या प्रसिद्ध फिल्म फ्रँचायझीमध्येही काम केले. ब्रूस विलिसने आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केले आहे. ब्रूस विलिसने त्यांच्या कारकिर्दीत गोल्डन ग्लोब आणि दोन एमी पुरस्कार जिंकले आहेत. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी 'द वर्डिक्ट', 'मूनलाइटिंग', 'द बॉक्सिंग', 'होस्टेज', 'आउट ऑफ डेथ', 'ग्लास' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
काय आहे Aphasia?
ब्रूस विलिस यांना झालेला अॅफेसिया(Aphasia) हा भाषेचा आजार आहे. यामध्ये रुग्णाला बोलण्यात आणि लिहिण्यात त्रास होतो. हा आजार मेंदूच्या त्या भागाला झालेल्या नुकसानामुळे होतो, जो भाग भाषा, अभिव्यक्ती आणि समज नियंत्रित करतो. हा आजार स्ट्रोक किंवा डोक्याला दुखापत झाल्यानंतर होऊ शकतो. याशिवाय हा आजार ब्रेन ट्यूमरमुळेही होतो.