चार्लीने दिले फॅन्सना वचन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2016 07:57 PM2016-11-03T19:57:59+5:302016-11-03T19:57:59+5:30

गायक चार्ली पुथ याने त्याच्या फॅन्सना वचन दिले की, दरवर्षी तो त्यांच्यासाठी नवा अल्बम रिलीज करणार आहे. चार्लीच्या या ...

Charlie promised Fans | चार्लीने दिले फॅन्सना वचन

चार्लीने दिले फॅन्सना वचन

googlenewsNext
यक चार्ली पुथ याने त्याच्या फॅन्सना वचन दिले की, दरवर्षी तो त्यांच्यासाठी नवा अल्बम रिलीज करणार आहे. चार्लीच्या या वचनामुळे फॅन्सना सुखद धक्का बसला असेल यात शंका नाही. 
एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार चार्लीने म्हटले की, मी दीर्घ काळ माझ्या फॅन्सपासून दूर राहू इच्छित नाही. सदैव त्यांच्या जवळ राहून मी त्यांचा सर्वाधिक आवडता कलाकार बनू इच्छितो. त्यामुळेच केवळ त्यांच्यासाठी मी दरवर्षाला अल्बम रिलीज करणार आहे. मला संगीत क्षेत्रात आणखी खूप काम करायचे आहे. माझे गहाण ठेवलेले घर सोडविण्यासाठी माझी धडपड सुरू असून, त्यासाठी मला भरपूर पैसे कमवायचे आहेत. त्यादृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मला माझे फॅन्स पाठिंबा देतील, अशी अपेक्षा आहे. यासाठी मला त्यांच्यासोबत राहणे गरजेचे असल्यानेच मी दरवर्षी नवा अल्बम रिलीज करणार आहे. 
सध्या मी म्युझिकवर अधिक लक्ष केंद्रित केले असून, टूरदरम्यान मला उत्तमोत्तम संगीत रचना तयार करणे अधिक सोपे जात असल्याचेही त्याने सांगितले. खरं तर मला टूरवर जाणे आवडत नाही, परंतु टूरदरम्यानच चांगले म्युझिक तयार करणे शक्य होत असल्याचेही त्याने सांगितले. 
चार्ली पुथ एक ब्रिटिश गायक असून, त्याने आतापर्यंत काढलेले सर्वच अल्बम हिट झाले आहेत. प्रेक्षकांचा त्याला मिळत असलेला पाठिंबा कौतुकास्पद असून, तो सध्या अधिकाधिक अल्बम काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सध्या तो तीन अल्बमवर काम करीत आहे. त्यातील दोन अल्बम नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात रिलीज केले जाण्याची शक्यता आहे. 

Web Title: Charlie promised Fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.