घरबसल्या ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर पाहा ‘ओपनहायमर’ सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 07:17 PM2023-11-21T19:17:34+5:302023-11-21T19:18:28+5:30

 ख्रिस्तोफर नोलनचा ‘ओपनहायमर’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Christopher Nolan's Oppenheimer to be available on OTT | घरबसल्या ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर पाहा ‘ओपनहायमर’ सिनेमा

 ख्रिस्तोफर नोलनचा ‘ओपनहायमर’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

 ख्रिस्तोफर नोलनच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे.  ख्रिस्तोफर नोलनचा ‘ओपनहायमर’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'अणुबॅाम्बचा जनक मानल्या जाणाऱ्या जे राॅबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.  २१ जुलैला रोजी चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता ओटीटीवर हा सिनेमा बघायला चाहते खूपच उत्सुक आहेत. 

 ख्रिस्तोफर नोलन यांनी 'ओपेनहायमर' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.  चित्रपटगृहात बघायची संधी हुकलेल्या प्रेक्षकांसाठी आता हा सिनेमा ओटीटीवर दाखल होत आहे.  'ओपनहायमर' हा चित्रपट २२ नोव्हेंबरपासून अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने एका खास व्हिडीओच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अतिरिक्त पैसे भरावे लागणार आहेत.

 ‘अमेरिकन प्रमिथियस: द ट्रायम्फ अॅण्ड ट्रॅजेडी ऑफ जे रॉबर्ट ओपेनहाइमर’ या चरित्राला प्रधान मानून या चित्रपटाची कथा रचण्यात आली आहे. हे चरित्र मार्टिन जे शेर्विन आणि काई बर्ड यांनी लिहिले आहे. या पुस्तकात ओपेनहाइमर यांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी उघड केल्या आहेत. या चित्रपटातील कथानकाच्या भारतीय संबंधांमुळे भारतात या चित्रपटाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. 

Web Title: Christopher Nolan's Oppenheimer to be available on OTT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.