‘ट्रिपल एक्स’साठी दीपिकाने ठेवली होती अट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2016 04:59 PM2016-10-28T16:59:43+5:302016-10-28T17:21:06+5:30

‘ट्रिपल एक्स - रिटर्न आॅफ एक्सएंडर केज’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये एंट्री करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोन सध्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध ...

The condition was kept by Deepika for 'Triple X' | ‘ट्रिपल एक्स’साठी दीपिकाने ठेवली होती अट

‘ट्रिपल एक्स’साठी दीपिकाने ठेवली होती अट

googlenewsNext
्रिपल एक्स - रिटर्न आॅफ एक्सएंडर केज’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये एंट्री करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोन सध्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध शोमध्ये हजेरी लावत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या संबंधित विविध आठवणींनाही उजाळा मिळत आहे. एका शोदरम्यान दीपिकाने सांगितले की, चित्रपटात काम करण्यापूर्वीच मी एक अट ठेवली होती. 
खरं तर हॉलिवूड चित्रपटाची आॅफर आल्यास कुठलीही अट न ठेवता स्टार लगेचच होकार देतात. मात्र दीपिकाची अट मान्य केल्यानंतरच दीपिकाने चित्रपटात काम करायला होकार दिला होता. दीपिकाने सुरुवातीलाच स्पष्ट शब्दात सांगितले होते की, चित्रपटाचा प्रीमियर भारतातच व्हायला हवा. जर होत नसेल तर मी काम करणार नाही. चित्रपट निर्मात्यांनी दीपिकाची ही अट लगेचच मान्य केली होती.
याबाबतचा नुकताच विन डिजल याने खुलासा केला असून, नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारतात प्रीमियर होणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. याविषयी विनने सांगितले की, चित्रपटाच्या कास्टिंगसाठी जेव्हा दीपिकाची मुलाखत घेण्यात आली तेव्हा तिने चित्रपटाच्या प्रीमियरविषयी अट ठेवली होती. जर मी या चित्रपटात भूमिका करत असेल तर चित्रपटाचा प्रीमियर भारतातच व्हायला हवा, असे तिने सुरुवातीलाच सांगितले होते. 
आता बॉलिवूडमध्ये टॉपच्या स्थानावर असलेल्या दीपिकाची ही अट मान्य होणार नाही, याची शक्यता धुसरच म्हणावी लागेल. निर्मात्यांनी दीपिकाला पहिल्याच मुलाखतीत तिची अट मान्य करीत चित्रपटात काम करण्याविषयी गळ घातली. निर्मात्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला भारतात चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. हा चित्रपटत २० जानेवारी रोजी सर्वत्र रिलिज केला जाणार आहे.

Web Title: The condition was kept by Deepika for 'Triple X'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.