Corona Virus: हा सुपरस्टार झाला दुर्लक्षित, सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर वेधले सा-यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 01:21 PM2020-03-14T13:21:43+5:302020-03-14T13:27:07+5:30

केरळ आणि दिल्लीतील सर्व चित्रपटगृहे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश संबंधित राज्य सरकारने गुरुवारीच जारी केले.

Corona Virus: superstar Jackie chan Became A Neglected, Grab Attention After sharing A Post on Social Media-SRJ | Corona Virus: हा सुपरस्टार झाला दुर्लक्षित, सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर वेधले सा-यांचे लक्ष

Corona Virus: हा सुपरस्टार झाला दुर्लक्षित, सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर वेधले सा-यांचे लक्ष

googlenewsNext

जगभरात जॅकीचे मोठा चाहता वर्ग आहे. कोरोनामुळे सगळ्यांनाच धास्ती भरली आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटीमंडळी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करतायेत. स्वतः जॅकीने इंस्टाग्रामवर आपला फोटो पोस्ट करून फॅन्सना  'मी सुरक्षित आणि तंदुरुस्त आहे. अशा करतो की, तुम्ही सर्वही स्वस्थ असाल.' अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.


कोरोनो व्हायरसचा संसर्ग चीन आणि भारत व्यतिरिक्त दक्षिण कोरिया आणि इटली पर्यंतही पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याला साथीचा रोग जाहीर केला आहे. तेव्हापासून भारतातही सिनेमागृह बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केरळ आणि दिल्लीतील सर्व चित्रपटगृहे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश संबंधित राज्य सरकारने गुरुवारीच जारी केले. नागरिकांनी शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत, मॉल, रेस्टॉरंट-हॉटेल्समध्ये जाणे टाळावे, क्रीडा स्पर्धा, राजकीय कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आयोजित करू नयेत किंवा त्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. त्यामुळे सगळीकडे शुकशुकाटच पाहायला मिळत आहे.

 

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांनी गुरुवारी सकाळी याबद्दल सोशल मीडियावरुन माहिती दिली होती. त्यानंतर आता टॉम यांनी त्यांची पत्नी रिटासोबतचा फोटो शेअर करत ते दोघंही या आजाराशी कसा लढा देत आहेत हे चाहत्यांना सांगितलं आहे.

Web Title: Corona Virus: superstar Jackie chan Became A Neglected, Grab Attention After sharing A Post on Social Media-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.