ट्रिपल एक्समध्येही दीपिकाचा देसी अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2016 05:01 PM2016-10-19T17:01:05+5:302016-10-19T17:01:05+5:30

जेव्हा एखादा भारतीय स्टार हॉलिवूडमध्ये एंट्री करतो तेव्हा तो स्वत:मध्ये बरेचसे बदल करण्याचा प्रयत्न करतो. त्यात सगळ्यात महत्त्वाचा बदल ...

Deepika's Desi Style in Triple X | ट्रिपल एक्समध्येही दीपिकाचा देसी अंदाज

ट्रिपल एक्समध्येही दीपिकाचा देसी अंदाज

googlenewsNext
व्हा एखादा भारतीय स्टार हॉलिवूडमध्ये एंट्री करतो तेव्हा तो स्वत:मध्ये बरेचसे बदल करण्याचा प्रयत्न करतो. त्यात सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे अ‍ॅक्सेंट अर्थात इंग्रजीचे उच्चारण. आपल्यालाही हॉलिवूड स्टार प्रमाणे इंग्रजी बोलता यावे यासाठी तो प्रयत्नशील असतो. प्रियांका चोप्रा जेव्हा क्वाँंटिकोमध्ये झळकली तेव्हा तिच्या बोलण्याचा अंदाज काहीसा असाच होता. परंतू या सगळ्यात दीपिका पादुकोण अपवाद आहे. तिच्या आगामी ट्रिपल एक्स या चित्रपटात ती देसी अंदाजमध्येच इंग्रजी बोलताना बघावयास मिळणार आहे. 
या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, यात दीपिकाची बोलण्याची शैली भारतीय अंदाजात आहे. जेव्हा तिला याबाबत विचारले तेव्हा ती म्हणाली की, ज्यापद्धतीने पाश्चात्य इंग्रजी बोलण्याची शैली संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे, तशीच भारतीय इंग्रजी बोलण्याची शैली संपूर्ण जगात प्रसिद्ध व्हायला हवी. आपण गेल्या कित्येक वर्षांपासून आॅस्ट्रेलिया आणि ब्रिटिश इंग्रजीचे अनुकरण करीत आहोत, मग भारतीय इंग्रजीची जगात छाप केव्हा पडणार? आता वेळ आलेली आहे की, जगाने भारतीय इंग्रजीचे अनुकरण करावे. दीपिकाने तिच्या ‘ट्रिपल एक्स’मध्ये इंग्रजी डबिंग तंतोतंत भारतीय उच्चारण पद्धतीने केले आहे. या चित्रपटात ती विन डीजल याच्यासोबत झळकणार आहे. दीपिका चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन करणार असून, ट्रेलरमध्ये याची झलक बघावयास मिळाली. 
आपल्या भूमिकेविषयी बोलताना दीपिका म्हणाली, हॉलिवूडपटात काम करण्याचा अनुभव रोमांचक होता. चित्रपटातील माझ्या भूमिकेला अतिशय हटके पद्धतीने सादर केले जाणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील माझे संवाद स्पष्टपणे प्रेक्षकांना मी भारतीय असल्याची जाणीव करून देणार आहेत. 

Web Title: Deepika's Desi Style in Triple X

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.