​आॅस्कर विकेंडला रिलीज होणार देव पटेलचा ‘लायन’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2016 06:42 PM2016-12-13T18:42:09+5:302016-12-13T18:42:09+5:30

वर्षाच्या शेवटचा काळ हा संभाव्य आॅस्कर विजेत्या चित्रपटांचा असतो. यंदाच्या आॅस्कर पुरस्कारांसाठी आघाडीवर असणाऱ्या ‘लायन’ सिनेमाची जोरदार चर्चा सुरू ...

Dev Patel will release 'Lion' | ​आॅस्कर विकेंडला रिलीज होणार देव पटेलचा ‘लायन’

​आॅस्कर विकेंडला रिलीज होणार देव पटेलचा ‘लायन’

googlenewsNext
्षाच्या शेवटचा काळ हा संभाव्य आॅस्कर विजेत्या चित्रपटांचा असतो. यंदाच्या आॅस्कर पुरस्कारांसाठी आघाडीवर असणाऱ्या ‘लायन’ सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘स्लमडॉग मिलेनेयर’ फेम देव पटेल प्रमुख अभिनेता असलेल्या या चित्रपटाला ‘टोरोंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०१६’मध्ये खूप नावाजण्यात आले.

समीक्षक आणि प्रेक्षकांनी सिनेमाचे तोंडभरून कौतुक करताना आगामी अ‍ॅकॅडमी पुरस्कारांमध्ये अग्रणी स्पर्धक म्हणून ‘लायन’ला पसंती दिली आहे. तसेच या महोत्सवात ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’साठी फर्स्ट रनर अप म्हणूनही त्याची निवड करण्यात आली.

नुकतेच अमेरिकेत मर्यादित स्वरुपात चित्रपट रिलीज करण्यात आला असून आगमी अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये ‘लायन’चा दबादबा पाहयला मिळेल अशी इंडस्ट्रीमध्ये चर्चा आहे.

दिग्दर्शक गॅरेथ डेव्हिसचा हा पहिलाच सिनेमा असून आॅस्ट्रेलियन-अमेरिकन-ब्रिटिश निर्मात्यांनी मिळून तो तयार केला आहे. सरू ब्रिअर्ली लिखित ‘अ लाँग वे होम’ नावाच्या पुस्तकावर तो आधारित असून ही एक सत्यकथा आहे.


लायन​ : देव पटेल

कोलकात्यातील एक गरीब ५ वर्षीय मुलगा सरू अपघाताने हरवल्यावर त्याला आॅस्ट्रेलियन दाम्पत्य दत्तक घेऊन आॅस्ट्रेलियाला घेऊन जाते. दूरवर आॅस्ट्रेलियातील टस्मानिया शहरात राहणाऱ्या सरूला मात्र घरची आठवण स्वस्थ बसू देत नाही.

भारतात मागे राहिलेल्या मूळ कुटुंबाला भेटण्यासाठी मग सुरू होता त्याचा अवघड शोधप्रवास. ‘गुगल अर्थ’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून तो घर शोधू लागतो. या प्रवासात त्याला येणारे अनुभवांचे दर्शन म्हणजे हा चित्रपट आहे.

देव पटेल, निकोल किडमन, रूनी मारा या हॉलीवूड कलाकारांबरोबरच अनेक बॉलीवूड कलाकारांनीसुद्धा ‘लायन’मध्ये काम केले आहे. यामध्ये प्रामुख्याने नवाजुद्दिन सिद्दिकी, प्रियांका बोस, तनिष्ठा चटर्जी आणि दीप्ती नवल यांचा समावेश आहे. चित्रपटाचा जागतिक प्रीमियर शो न्यूयॉकमध्ये झाला. प्रीमियरला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनसुद्धा उपस्थित होते.

Web Title: Dev Patel will release 'Lion'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.