डिकॅप्रिओ करणार ‘ट्रुवाईन’मध्ये काम?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2016 02:04 PM2016-10-19T14:04:48+5:302016-10-19T14:08:08+5:30
आॅस्कर विजेता लिओनार्दो डिकॅप्रिओचा पुढचा कोणता सिनेमा असेल याबद्दल सर्वचजण अंदाज-आराखडे बांधत आहेत. तुम्हालासुद्धा अशी उत्सुकता असेल तर आमच्याकडे ...
आ स्कर विजेता लिओनार्दो डिकॅप्रिओचा पुढचा कोणता सिनेमा असेल याबद्दल सर्वचजण अंदाज-आराखडे बांधत आहेत. तुम्हालासुद्धा अशी उत्सुकता असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
बेथ मेसी लिखित ‘ट्रुवाईन : टू ब्रदर्स, अ किडनॅपिंग, अँड अ मदर्स क्वेस्ट; अ ट्रु स्टोरी आॅफ द जीम क्रो स्मिथ’ या पुस्तकाचे अधिकार विकत घेण्याचा लिओ प्रयत्न करत आहे. त्याच्या बॅनर अंतगर्त तो या पुस्तकावर आधारित सिनेमा प्रोड्युस आणि त्यात अभिनयदेखील करणार असल्याची चर्चा आहे.
दोन कृष्णवर्णीय भावांची ही कथा असून त्यांचे अपहरण करून त्यांना सर्कसमध्ये काम करण्यास भाग पाडले जाते. आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी त्यांच्या आईने सुमारे २८ वर्षे लढा दिला होता. १८९९ साली घडलेले हे कथानक आहे.
जॉर्ज आणि विली म्युज नावाचे या दोन भावांचे ट्रुवाईन येथील एका तंबाखूच्या शेतातून एका श्वेतवर्णीय माणसाने चॉकलेचे अमिष दाखवून अपहरण केले होते. मग त्यांना सर्कसमध्ये काम करण्यास भाग पाडून इंग्लंडच्या बकिंगहॅम पॅलेस येथे राजघराण्यातील लोकांसमोर त्यांचे सादरीकरण करण्यात आले.
त्यांच्या जबदरस्त कौशल्यामुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहले. न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे तर त्यांनी कित्येक हाऊसफूल शो केले. टीव्ही आणि रेडिओपूर्वीच्या काळात ते जागतिक सुपरस्टार बनले होते.
या दरम्यान त्यांची आई त्यांना परत मिळवण्यासाठी लढा देत राहिली. त्याकाळी कृष्णवर्णीय लोकांना रानटी मानले जाई. शेतातूून अचानक ‘गायब’ झालेल्या मुलांना परत मिळवण्यासाठी या माऊलीने २८ वर्षे अविरत संघर्ष केला.
cnxoldfiles/a> अडकणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे.