या कारणामुळे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन 14 दिवसांसाठी झाले क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 03:18 PM2020-06-04T15:18:47+5:302020-06-04T15:20:00+5:30
सध्याच्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या दोघांनीही सरकारचा आदेश पाळत 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे.
लॉकडाऊननंतर, अनेक देशात हळूहळू अनलॉक होण्यास प्रारंभ झाला आहे. खबरदारी बाळगत घरात बंदिस्त असलेले लोक गरजेनुसार बाहेर पडु लागले आहेत. तसेच बंद पडलेले कामधंद्यांना देखील हळू हळू सुरूवात होत आहे. लोकांनी कामावर परतताना कोणती सावधगिरी बाळगायला हवी, यासाठी सरकारने जागरुकता निर्माण करणे सुरु केले आहे.
तसेच नागरिकांनीदेखील शासनाने जारी केलेले नियम पाळत काम करणे गरजेचे आहे. म्हणूनच दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन चित्रपटाच्या निर्मात्यासह न्यूझीलंडला पोहोचले आहेत. परंतु सध्याच्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या दोघांनीही सरकारचा आदेश पाळत 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. सध्याच्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या दोघांनीही सरकारचा आदेश पाळत 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे.
'अवतार' या सायन्स फिक्शन चित्रपटाच्या सिक्वेलचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. खरंतर चित्रपटाचे शूटिंग मे महिन्यात सुरू होणार होते, परंतु जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे समोर आल्यानंतर हे थांबविण्यात आले होते. योग्य ती सावधगिरी बाळगली तर हा आजार होण्याची शक्यता कमी असते म्हणून योग्य खबरदारीनुसारच विविध देशातील कामकाजही पूर्वपदावर येत आहे.