मृत्यूसमयी मर्लिन मुनरोने जूडीला मागितली होती मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2017 03:38 PM2017-02-03T15:38:31+5:302017-02-03T21:08:31+5:30

हॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री जूडी गारलॅण्डचा तिसरा पती सिड लुफ्त याने त्याच्या नव्या पुस्तकात खुलासा केला की, जूडी आणि मर्लिन ...

During the death, Marilyn Monroe had asked for help | मृत्यूसमयी मर्लिन मुनरोने जूडीला मागितली होती मदत

मृत्यूसमयी मर्लिन मुनरोने जूडीला मागितली होती मदत

googlenewsNext
लिवूडची दिवंगत अभिनेत्री जूडी गारलॅण्डचा तिसरा पती सिड लुफ्त याने त्याच्या नव्या पुस्तकात खुलासा केला की, जूडी आणि मर्लिन मुनरो अतिशय जवळच्या मैत्रिणी होत्या. दोघीही एकमेकींना विश्वास पात्र समजत होत्या. मात्र त्यांच्यात असे काही घडले होते ज्यामुळे मृत्यूअगोदर मर्लिन मुनरो हिला जूडी गारलॅण्डची मदत मागावी लागली होती.  

पीपल मॅग्जीनने दिलेल्या माहितीनुसार, सिड लुफ्तने त्यांच्या ‘जूडी अ‍ॅण्ड आय’ या पुस्तकात दोघींच्या नात्यातील अनेक गुपितं उघड केली. त्यातीलच एक धक्कादायक खुलासा म्हणजे मुनरोने १९६२ मध्ये मृत्यूअगोदर जूडीला मदत मागितल्याचा होय. लुफ्तने लिहले की, मुनरोच्या मृत्यूनंतर जूडी खूपच अस्वस्थ होती. जेव्हा मुनरो तब्येतीच्या कारणास्व बेडवरच पडून असायची तेव्हाही त्या दोघी टेलिफोनच्या माध्यमातून एकमेकींशी संवाद साधत असत.
 
मुनरोला असे वाटत होते की, जूडी तिच्या या आजारपणाला समजत आहे. जूडीदेखील तिला वारंवार दिलासा देत होती. एकदा जूडीने मुनरोला म्हटले होते की, ‘जेव्हा-केव्हा तुला भीती वाटत असेल तेव्हा तू माझ्याकडे येऊन जा, आपण दोघी बसून गप्पा मारू’ जूडीचे हे वाक्य मुनरोला अस्वस्थ करणारे होते. ती सातत्याने जूडीशी बोलत असे. तसेच तिच्या अधिकाधिक सहवासात राहण्याचा प्रयत्न करीत असे. 

जूडीलादेखील मुनरोचा सहवास आवडत असे. तिला तिची खूप चिंता सतावत होती. ती सातत्याने तिच्या तब्येतीची विचारपूस करीत असे. मात्र अखेरच्या क्षणी जेव्हा मुनरोची तब्येत खालावली तेव्हा तिने भीतीपोटी जूडीकडे मदत मागितली होती. ती मृत्यूला घाबरली असावी, असा अंदाज मी त्यावेळी वर्तविला होता, असा खुलासाही सिड लुफ्तने पुस्तकात केला आहे. 

Web Title: During the death, Marilyn Monroe had asked for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.