'द रॉक' उर्फ ड्वेन जॉन्सनवर कोसळला दुःखाचा डोंगर, वाचून तुम्हीही व्हाल भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 03:24 PM2020-01-16T15:24:54+5:302020-01-16T15:25:28+5:30
Rocky Johnson's Death : हॉलिवूडचा सुपरस्टार द रॉक उर्फ ड्वेन जॉन्सनवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
डब्ल्यूडब्ल्यूईचे स्टार रॉकी जॉन्सन यांचे निधन झाले आहे. ते हॉलिवूडचा सुपरस्टार ड्वेन जॉन्सन यांचे वडील होते. रॉकी यांचे निधन कशामुळे झाले हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यांचे चाहते सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
रॉकी जॉन्सनच्या करियरबद्दल सांगायचं तर १९८०च्या दशकाच्या सुरूवातीला त्यांनी डब्ल्यूडब्ल्यूईमधून करियरला सुरूवात केली होती. इथे त्यांना खूप यश मिळाले आणि काही दिवसात त्यांची गिनती डब्ल्यूडब्ल्यूईच्या दिग्गजांमध्ये होऊ लागली. डब्ल्यूडब्ल्यूई संघटनेने रॉकी जॉन्सन यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
रॉकी जॉन्सन यांचा जन्म २४ ऑगस्ट, १९४४मध्ये कॅनडामध्ये झाला होता. छोट्या वयात ते नॅशनल रेसलिंग अलायन्समध्ये सहभागी झाले होते. रॉकी यांना तीन मुले आहेत ड्वेन, कर्टिस व वंडा बाऊल्स. वडिलांप्रमाणे ड्वेननेदेखील आपल्या करियरची सुरूवात रिंगमधून केली होती. ड्वेन डब्ल्यूडब्ल्यूई व डब्ल्यूडब्ल्यूएफमध्ये द रॉक या नावाने ओळखला जातो.
रॉकी यांनी टोनी एटलससोबत मिळून डब्ल्यूडब्ल्यूईसाठी द सोल पैट्रोल नामक टीम बनवली होती. विशेष बाब म्हणजे डब्ल्यूडब्ल्यूईची पहिली अफ्रिकी अमेरिकी टीम होती आणि या टीमने १९८३ साली वाईल्ड सैमोन्सला हरविले होते.