जग गाजवणारा एड शीरन चेन्नईमध्ये रमला, कॉन्सर्टच्या आधी देसी स्टाईल 'चंपी'चा घेतला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 17:05 IST2025-02-05T17:04:31+5:302025-02-05T17:05:40+5:30

जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या एड शीरननं चैन्नईमध्ये देसी 'चंपी'चा आनंद घेतलाय. 

Ed Sheeran Receives Traditional Indian Head Massage In Chennai | जग गाजवणारा एड शीरन चेन्नईमध्ये रमला, कॉन्सर्टच्या आधी देसी स्टाईल 'चंपी'चा घेतला आनंद

जग गाजवणारा एड शीरन चेन्नईमध्ये रमला, कॉन्सर्टच्या आधी देसी स्टाईल 'चंपी'चा घेतला आनंद

Ed Sheeran: आपल्या गाण्यांनी जगभरात खळबळ माजवणारा गायक एड शीरन सध्या भारतात धुमाकूळ घालतोय. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेला हा गायक चैन्नईमध्ये पोहोचला आहे. आज ५ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आहे. त्याआधी त्यानं चैन्नईमध्ये देसी 'चंपी'चा (Ed Sheeran Indian Head Massage In Chennai) आनंद घेतलाय. 

एड शीरनची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. 'शेप ऑफ यू' या गाण्यानंतर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर परदेशीच नाही तर भारतीय चाहत्यांची संख्याही वाढली. आता आपल्या इन्स्टाग्रामवर त्यानं एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात एक व्यक्ती देसी स्टाईलने त्याच्या डोक्याची चंपी करताना दिसतोय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. चाहते त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.


एड शीरन हा भारतातील ६ शहरांचा दौरा करत आहे. चैन्नईआधी ३० जानेवारी रोजी पुण्यात त्याचा कॉन्सर्ट पार पडला. तर रविवारी हैदराबादमध्ये त्याचा दुसरा कॉन्सर्ट होता. पुणेकर आणि हैद्राबादमधील चाहत्यांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला. पुणे आणि हैद्राबादनंतर चेन्नईमध्ये त्याच्या लाईव्ह शोसाठी चाहते उत्सुक आहेत. तर चैन्नईनंतर तो ८ फेब्रुवारी रोजी बंगळुरू, त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी शिलाँग आणि १५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत त्याचा शेवटचा कॉन्सर्ट असणार आहे. 
 

Web Title: Ed Sheeran Receives Traditional Indian Head Massage In Chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.