‘बिस्ट’सोबत रोमांस करणार एमा वॉटसन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2016 01:46 PM2016-11-22T13:46:59+5:302016-11-22T13:46:59+5:30

​बहुचर्चित ‘ब्यूटी अ‍ॅण्ड द बीस्ट’ या हॉलिवूडपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला असून, १८ तासातच यू-ट्यूबवर या ट्रेलरला ६५ लाख हिट्स मिळाल्या आहेत.

Emma Watson to romance with 'Bist' | ‘बिस्ट’सोबत रोमांस करणार एमा वॉटसन

‘बिस्ट’सोबत रोमांस करणार एमा वॉटसन

googlenewsNext
ुचर्चित ‘ब्यूटी अ‍ॅण्ड द बीस्ट’ या हॉलिवूडपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला असून, १८ तासातच यू-ट्यूबवर या ट्रेलरला ६५ लाख हिट्स मिळाल्या आहेत. 
चित्रपटात अभिनेत्री एमा वॉटसन लीड रोलमध्ये बघावयास मिळत आहे. ती यापूर्वी हॅरी पॉटर सीरीजमध्ये हर्माइनी ग्रेंजर नावाच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली होती.  अभिनेता डॅन स्टीवंस बिस्टच्या भूमिकेत आहे. बिल कॉन्डन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच बºयाचशा कारणांनी चर्चेत आहे. 
त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षकांकडून आतुरतेने वाट पाहिली जात होती. गेल्या सोमवारी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ‘डिज्नी’ची प्रस्तृती असल्याने ट्रेलरमध्ये काही तरी रंजक असेल या विचाराने प्रेक्षकांनी ट्रेलर बघण्यासाठी यू-ट्यूबवर अक्षरश: उड्या घेतल्या. त्यामुळेच अवघ्या १८ तासात तब्बल ६५ लाख हिट्स मिळाल्या. 
ट्रेलरमध्ये एमा अतिशय सुंदर दिसत असून, बिस्टच्या भूमिकेत असलेल्या डॅन स्टीवंस व एमाची लव्ह स्टोरी दाखविण्यात आली आहे. बिस्टच्या दुनियेत आलेल्या एमाला सुरुवातीच्या काळात कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यानंतर तिची तेथील वस्तू तसेच प्राण्याशी कशी गट्टी जमते. पुढे बिस्टच्या कशी ती प्रेमात पडते अन् तेथूनच कसा संघर्ष निर्माण होतो, अशा सुंदर कथेच्या ट्रेलरवरून अंदाज बांधणे सहज शक्य होतो. 
हॅरी पॉटरमध्ये प्रेक्षकांच्या मनात बसलेल्या एना वॉटसनला या चित्रपटाकडून बºयाचशा अपेक्षा आहेत. तसेच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल याची तिला खात्री असल्याचे ती सांगते. हा चित्रपट नव्या वर्षात म्हणजेच १७ मार्च २०१७ रोजी रिलीज होणार आहे. 


 

Web Title: Emma Watson to romance with 'Bist'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.