Tarzan Joe Lara: बालपणीचा 'टारझन' कालवश; जो लारा यांच्यासह सात जणांचा विमान अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 12:17 PM2021-05-31T12:17:22+5:302021-05-31T12:20:08+5:30

'Tarzan' actor Joe Lara died: जो लारा यांनी 1989 मध्ये टेलिव्हिजन फिल्म टारझन इन मॅनहॅटन यात टारझनची भूमिका साकारली होती. यानंतर त्यांनी टारझन: द इपिक अॅडव्हेंचर्स या टीव्ही सिरिअलमध्ये काम केले होते. ही सिरीज 1996-97 चालली होती. 

famous adventure movie 'Tarzan' actor Joe Lara passes away at 58 in plane crash | Tarzan Joe Lara: बालपणीचा 'टारझन' कालवश; जो लारा यांच्यासह सात जणांचा विमान अपघातात मृत्यू

Tarzan Joe Lara: बालपणीचा 'टारझन' कालवश; जो लारा यांच्यासह सात जणांचा विमान अपघातात मृत्यू

googlenewsNext

अमेरिकेतील विमान दुर्घटनेमध्ये (Plane Crash) सुप्रसिद्ध हॉलिवूड सिनेमा 'टारझन' (Tarzan) अभिनेता जो लारासह  (Joe Lara) सात जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जो लारा यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. लारा यांनी ग्वेन शम्बलिन यांच्याशी 2018 मध्येच विवाह केला होता. रदरफोर्ड काऊंटीचे फायर रेस्क्यू कॅप्टन जॉन इंगल यांनी सांगितले की, स्मिर्नाच्या शेजारील प्रीस्ट तलावामध्ये शोधकार्य सुरु आहे. जो लारा 58 वर्षांचे होते. (Actor Joe Lara- the star of the famous adventure movie 'Tarzan: The Epic Adventures' has passed away in a plane crash in Tennessee.)


काऊंटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सात लोकांची ओळख पटली आहे. ब्रैंडन हन्ना, ग्वेन एस लारा, विलियम जे लारा, डेविड एल मार्टिन, जेनिफर जे मार्टिन, जेसिका वॉल्टर्स आणि जॉनाथन वाल्टर्स अशी त्यांची नावे आहेत. 


विमानोड्डाण प्रशासनाने सांगितले की, स्मिर्ना रदरफोर्ड काउंटी विमानतळावरून शनिवारी दुपारी 11 वाजता ‘सेसना सी501’ विमानाने उड्डाण केले होते. यानंतर काही वेळातच ते दुर्घटनाग्रस्त झाले. ते पर्सी प्रीस्ट झीलमध्ये कोसळले. हे विमान पाम बीच या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणार होते. प्रत्यक्षदर्शींनी हे विमान तलावाच्या पाण्यात पडताना पाहिले. 


जो लारा यांनी 1989 मध्ये टेलिव्हिजन फिल्म टारझन इन मॅनहॅटन यात टारझनची भूमिका साकारली होती. यानंतर त्यांनी टारझन: द इपिक अॅडव्हेंचर्स या टीव्ही सिरिअलमध्ये काम केले होते. ही सिरीज 1996-97 चालली होती. 


जो लारा हे त्यांच्या अभिनय क्षेत्रात अत्युच्च शिखरावर होते. परंतू त्यांनी संगितामध्ये करिअर करण्यासाठी 2002 मध्ये जवळपास 20 वर्षांच्या अभिनयाच्या क्षेत्रावर पाणी सोडले. अॅक्शन सिनेमे आर्मस्ट्राँग आणि वॉरहेड ही आजही त्यांची आठवण आणून देतात. त्यांनी दोन विवाह केले होते. 
 

Web Title: famous adventure movie 'Tarzan' actor Joe Lara passes away at 58 in plane crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.