बापरे! गायिकेच्या कॉन्सर्टला गेलेल्या लोकांना झाला 'मेमरी लॉस', तीन तास काय केलं लक्षातच नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 11:02 AM2023-06-02T11:02:11+5:302023-06-02T11:04:35+5:30
ते कॉन्सर्टमध्ये होते आणि तिथे काय झालं हे त्यांच्या लक्षातच नाही अशी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
आपल्या आवडीच्या गायकांना लाईव्ह परफॉर्म करताना पाहणं हे अनेकांसाठी अविस्मरणीय असतं. त्यांची गाणी प्रत्यक्ष ऐकणं, अनुभव घेणं अनेकांसाठी खास असतं. पाश्चात्त्य देशात तर लाईव्ह शोजना तुफान गर्दी असते. हॉलिवूड गायिका टेलर स्विफ्टचे (Taylor Swift) शो बघण्यासाठी तर प्रेक्षक महिनोन्महिने वाट बघत असतात. टेलर स्विफ्टची क्रेझ प्रचंड आहे. पण जर तुम्हाला टेलर स्विफ्टचा लाईव्ह शो बघून आल्यानंतर काही लक्षातच नाही राहिलं तर? तुम्ही तीन चार तास नेमकं काय केलं हे तुम्ही विसरुनच गेलात तर? होय असं झालंय.
टेलर स्विफ्टच्या चाहत्यांनी दावा केलाय की त्यांना 'पोस्ट कॉन्सर्ट एमनेसिया' झालाय.टेलर स्विफ्टच्या Eras टूरदरम्यान ही घटना घडली आहे. म्हणजेच त्यांना काहीच लक्षात नाही. ते कॉन्सर्टमध्ये होते आणि तिथे काय झालं हे त्यांच्या लक्षातच नाही अशी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे टेलर स्विफ्टचे चाहते सध्या हैराण झालेत कारण त्यांना आपल्या आवडीच्या गायिकेची लाईव्ह कॉन्सर्टच लक्षात नाहीए. याबाबत गेल्या काही दिवसांपासून ते सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत आणि आपला अनुभव शेअर करत आहेत. त्यांना वाटतंय टेलर स्विफ्टची ती टूर जसं काय स्वप्न होतं.
मनोवैद्यानिकांनुसार, याचं मुख्य कारण भावना आणि वेळ असू शकतं. एमनेसिया हा एक गंभीर आजार होऊ शकतो. तर काही डॉक्टरांनुसार कॉन्सर्टनंतर मेमरी लॉस होणे यात घाबरण्यासारखे नाही. खरंतर कॉन्सर्ट नेहमी लक्षात राहण्यासारखी असते. पण काहीवेळा काहीजणांना सगळ्या गोष्टी लक्षात न राहता मोजक्या गोष्टीच लक्षात राहू शकतात. त्यामुळे हे दिसतं तितकं गंभीर नाही.