​इव्हान मॅकग्रेगरची ‘स्टार वॉर्स’मध्ये परतण्यासाठी फिल्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2016 07:31 PM2016-10-19T19:31:49+5:302016-10-19T19:31:49+5:30

साय-फाय फिल्म ‘स्टार वॉर्स’मध्ये पुन्हा एकदा काम करण्यासाठी ईव्हान मॅकग्रेगर जोरदार फिल्डिंग लावत आहे. ‘ट्रेनस्पॉटिंग’ स्टार मॅकग्रेगरला आता पुन्हा ...

Fielding to return to Evan McGregor's 'Star Wars' | ​इव्हान मॅकग्रेगरची ‘स्टार वॉर्स’मध्ये परतण्यासाठी फिल्डिंग

​इव्हान मॅकग्रेगरची ‘स्टार वॉर्स’मध्ये परतण्यासाठी फिल्डिंग

googlenewsNext
य-फाय फिल्म ‘स्टार वॉर्स’मध्ये पुन्हा एकदा काम करण्यासाठी ईव्हान मॅकग्रेगर जोरदार फिल्डिंग लावत आहे. ‘ट्रेनस्पॉटिंग’ स्टार मॅकग्रेगरला आता पुन्हा एकदा ‘स्टार वॉर्स’ फिल्म करण्याचे वेध लागले आहेत.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘स्टार वॉर्स : फोर्स अवेकन’ या सिनेमाने अमेरिकेत कमाईचे सर्व उच्चांक मोडित काढले. त्यामुळे या फ्रँचाईजीबद्दल निर्माते आणि प्रेक्षक दोघेही खूप उत्सुक आहेत. म्हणून तर मॅकग्रेगर ‘ओबी-वॅन केनोबाी’ ही भूमिका पुन्हा एकदा साकारण्यासाठी निर्मात्यांशी बोलणी करत आहे.

तो म्हणतो की, अ‍ॅलेक गिनिज यांनी केलेली केनोबीची भूमिका आणि नंतर मी केलेली तीच भूमिका यादरम्यान एक छान कथा आहे, असे मला नेहमीच वाटते. आणि आता माझ्या वयाला साजेशी अशी ही भूमिका खूपच रंजक ठरू शकते. हेच कारण आहे मला ‘स्टॉर वॉर्स’ चित्रपटांत पुन्हा एकदा काम करायचे आहे.

अ‍ॅलेक यांनी जेव्हा ती भूमिका केली होती तेव्हा ते ६० वर्षांचे होते तर मॅकग्रेगर आता ४५ वर्षांचा आहे. त्यामुळे दोन्ही वयाच्या भूमिका तो करू शकतो, असा त्याला विश्वास आहे.

Ewan McGregor

पण कळीचा मुद्दा हा आहे की, तो स्वत:ला कितीही योग्य उमेदवार समजत असला तरी निर्मात्यांचे मन वळविण्यात तो यशस्वी होईल का?

कारण मॅकग्रेगरने केलेले ‘स्टार वॉर्स’ सिनेमांना समीक्षकांनी चांगलेच झोडपून काढलेले आहे. त्यामुळे निर्माते त्याला परत एकदा चित्रपटात घेण्याची जोखिम घेतील की नाही हे हाच खरा प्रश्न आहे. पण त्याआधी मॅकग्रेगरचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ट्रेनस्पॉटिंग २’ पुढील वर्षी येत आहे.

Web Title: Fielding to return to Evan McGregor's 'Star Wars'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.