Corona Virus: बनून तयार आहे कोरोना व्हायरसवरचा पहिला सिनेमा, नाव काय ते वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 12:34 PM2020-04-10T12:34:51+5:302020-04-10T12:36:43+5:30

कॅनेडियन दिग्दर्शक मुस्तफा केशवारी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

first film on corona pandemic corona fear is a virus is ready to release-ram | Corona Virus: बनून तयार आहे कोरोना व्हायरसवरचा पहिला सिनेमा, नाव काय ते वाचा

Corona Virus: बनून तयार आहे कोरोना व्हायरसवरचा पहिला सिनेमा, नाव काय ते वाचा

googlenewsNext
ठळक मुद्देया चित्रपटाची कथा 7 लोकांवर आधारीत आहे.

कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे़ लाखो लोक कोरोनाग्रस्त आहेत. हजारो मृत्युमुखी पडलेत़ अशात अख्ख्या जगाला हादरवून सोडणा-या कोरोना  व्हायरसवरचा पहिला सिनेमा बनून तयार झाल्याची बातमी आहे. होय, Corona: Fear is a Virus असे या चित्रपटाचे नाव आहे. कॅनेडियन दिग्दर्शक मुस्तफा केशवारी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाची कथा 7 लोकांवर आधारीत आहे. हे सात लोक एका लिफ्टमध्ये अडकून पडले आहेत. शहरात पसरलेल्या व्हायरसमुळे सगळीकडे हाहाकार माजला असताना लिफ्टमध्ये अडकून पडलेल्या या सातपैकी एक महिला खोकू लागते आणि सगळ्यांची भीतीने गाळण उडते. हा कोरोनावरचा पहिला चित्रपट असल्याचा दावा केला जात आहे.

केशवारी यांनी आपल्या या चित्रपटाबद्दल बीबीसीसोबत संवाद साधला. ते म्हणाले, जानेवारीत चीनच्या वुहान शहरात व्हायरस पसरल्यानंतर मला या चित्रपटाची कल्पना सुचली. हा व्हायरस इतक्या लवकर जगभर पसरेल आणि हजारो लोकांचे बळी घेईल, याची त्याक्षणी मला जराही कल्पना नव्हती. पण कल्पना सुचल्यानंतर महिनाभरात मी माझा चित्रपट पूर्ण केला.

केशवारी यांच्या मते, अशा महामारीवर चित्रपट बनवणे गैर नाही. पण हो, इतक्या लवकर तो रिलीज करणे योग्य नाही. कारण या चित्रपटात व्हायरसची ती भयावहता दाखवलेली नाही, ज्यातून सध्या जग जातेय. पण हा चित्रपट नक्कीच लोकांचा दृष्टिकोन बदलेल. एप्रिलच्या अखेरिस या चित्रपटाची आॅनलाईन स्ट्रिमिंग सुरु होईल.
तूर्तास कोरोना व्हायरसमुळे जग ठप्प आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूडही ठप्प पडले आहे. अख्खा मनोरंजन उद्योग, या उद्योगावर अवलंबून असलेले हजारो कामगारांचे आयुष्यही संकटात सापडले आहे. बॉलिवूडमध्ये या उद्योगावर अनेक लोकांचे पोट अवलंबून आहे. पण काम बंद झाल्यामुळे त्यांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: first film on corona pandemic corona fear is a virus is ready to release-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.