'गेम ऑफ थ्रोन्स' मधील अभिनेत्री Diana Rigg यांचं निधन, भारतात घालवलं होतं बालपण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 12:20 PM2020-09-11T12:20:51+5:302020-09-11T12:23:24+5:30
'गेम ऑफ थ्रोन्स' आणि 'जेम्स बॉन्ड' सिनेमात काम केलेल्या अभिनेत्री डायना रिग याचं वयाच्या ८२ वर्षी निधन झालं.
'गेम ऑफ थ्रोन्स' आणि 'जेम्स बॉन्ड' सिनेमात काम केलेल्या अभिनेत्री डायना रिग याचं वयाच्या ८२ वर्षी निधन झालं. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, त्यांच्या एजंटने सांगितले की, डायना यांचं कॅन्सरने निधन झालं. त्यांच्या निधनावेळी त्यांचा परिवार त्यांच्यासोबत होता.
डायना यांची मुलगी Rachael Stirling ने सांगितले की, माझी प्रिय आई आज सकाळी घरीच परिवारासमोर नेहमीसाठी झोपी गेली. मार्चमध्ये तिला कॅन्सर झाल्याचे समजले. तिने तिचे शेवटचे दिवस आनंदाने आणि हसत घालवले. मला तिची किती कमतरता जाणवते हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.
"We are very sad to hear of the passing of Dame Diana Rigg, the legendary stage and screen actress who was much beloved by Bond fans for her memorable performance as Tracy di Vicenzo in On Her Majesty’s Secret Service, the only woman to have married James Bond." pic.twitter.com/nqQCSg35oM
— James Bond (@007) September 10, 2020
डायना यांची दुसरी भाषा होती हिंदी
अभिनेत्री डायना रिग यांचा जन्म यूकेत झाला होता. पण त्यांचे वडील बीकानेरच्या महाराजांसोबत इंजिनिअर म्हणून काम करत होते. त्या वर्षांच्या होईपर्यंत भारतातच वाढल्या आणि त्यानंतर इंग्लंडला परत गेल्या होत्या. त्यांची दुसरी भाषा हिंदी होती.
डायना यांनी On Her Majesty's Secret Service मध्ये जेम्स बॉन्डच्या पत्नीची भूमिका केली होती. तेच डायना रिग यांना टीव्ही सीरीज Games Of Thrones मध्ये Olenna Tyrell ची भूमिका साकारूनही लोकप्रियता मिळाली होती. या सीरीजमध्ये काम करणं त्यांचं शेवटचं काम ठरलं. त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
'ब्लॅक पॅंथर' स्टार चॅडविक बॉसमनचं निधन, ४ वर्षांपासून कॅन्सरसोबत देत होता लढा!
बॅटमॅनही कोरोना व्हायरसच्या जाळ्यात, सुरू झालेलं शूटींग पुन्हा बंद...