बॉलिवूडवर भारी पडतोय हॉलिवूड सिनेमा! 'गॉडझिला X काँग'ने १० दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 14:23 IST2024-04-08T14:20:54+5:302024-04-08T14:23:10+5:30
हॉलिवूड चित्रपट 'गॉडझिला X कॉंग' दिवसेंदिवस इंडियन बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम रचत आहे.

बॉलिवूडवर भारी पडतोय हॉलिवूड सिनेमा! 'गॉडझिला X काँग'ने १० दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला
Godzila X Kong Box Office Collection :हॉलिवूड चित्रपट 'गॉडझिला X कॉंग' दिवसेंदिवस इंडियन बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम रचत आहे. या बहुचर्चित सिनेमाने अवघ्या १० दिवसांत ७० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड चित्रपटांना 'गॉडझिला X कॉंग'- द न्यू एम्पायर हा हॉलिवूडसिनेमा जबरदस्त टक्कर देताना दिसतोय. केवळ जगभरातच नाही तर भारतीय सिनेमागृहांमध्ये देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्वत्र गॉडझिला X कॉंग' या सिनेमाची चर्चा रंगताना दिसतेय. बॉलिवूड चित्रपटांना कमालाची टक्कर देत हा चित्रपट कमाईच्या बाबतीत वरचढ ठरत आहे.
'गॉडझिला X कॉंग' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याने बक्कळ कमाई केली आहे, शिवाय या चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा करीना कपूरच्या 'क्रु' तसेच पृथ्वीराज सुकुमारन यांच्या 'आडुजीवितम' या चित्रपटांवर भारी पडत आहे. रिलीजनंतर 'गॉडझिला X कॉंग' ने अवघ्या १० दिवसांत करोडोंच्या घरात कमाई केल्याचं सांगण्यात येतंय.
पहिल्याच दिवशी १३.२५ कोटी इतकी शानदार ओपनिंग करत या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं. त्याचबरोबर पहिल्याच आठवड्यात ५७.७४ कोटी इतकी कमाई करत या चित्रपटाने सिनेमागृहात आपला दबदबा निर्माण केल्याचं पाहायला मिळतंय. नुकतेच या चित्रपटाचे दुसऱ्या आठवड्यातील कमाईचे आकडे देखील समोर आलेत. सॅल्कनिल्कने दिलेल्या माहितीनूसार सिनेमाने दुसऱ्या आठवड्यातही ६.२५ कोटींची मजल मारत १० दिवसांमध्ये एकूण ७२.७५ कोटी इतका गल्ला जमा केला आहे.
'गॉडझिला X कॉंग'या सिनेमाचं दिग्दर्शन हॉलिवूड दिग्दर्शक आदम विंगार्ड यांनी केलं आहे. या चित्रपटात हॉलिवूड अभिनेत्री रेबेका हॉल, अभिनेता ब्रायन टायरी हेनरी तसेच कायली हॉटल,एलेक्स फर्न्स शिवाय फाला चेन यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. हा चित्रपट भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू अशा विविध भाषांमध्ये प्रदर्शित केला गेला आहे.