ग्वेन स्टेफनीने दिली ‘खुल्लम खुल्ला’ प्रेमाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2017 12:41 PM2017-02-24T12:41:29+5:302017-02-24T18:11:29+5:30

गायिका ग्वेन स्टेफनी तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. ‘जो भी करेंगे खुल्लम खुल्ला’ असे नेहमीच आपल्या कृतीतून दाखवून देणाºया ...

Gwen Stefani gave 'Khullam Khulla' love confession | ग्वेन स्टेफनीने दिली ‘खुल्लम खुल्ला’ प्रेमाची कबुली

ग्वेन स्टेफनीने दिली ‘खुल्लम खुल्ला’ प्रेमाची कबुली

googlenewsNext
यिका ग्वेन स्टेफनी तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. ‘जो भी करेंगे खुल्लम खुल्ला’ असे नेहमीच आपल्या कृतीतून दाखवून देणाºया स्टेफनीने प्रेमाची कबुलीदेखील अशीच दिली आहे. अगदी बिनधास्तपणे तिने बॉयफ्रेंड ब्लेक शेल्टन याच्यावरील प्रेमाचा खुलासा केला आहे. 

यूएसमॅगझीन डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ‘लेट नाइट विद सेथ मेयर्स’ या टीव्ही शोमध्ये स्टेफनीला ‘द वॉयस’च्या पॅनलचा कोच गायक शेल्टनसोबतच्या रोमान्सविषयी विचारले. तेव्हा स्टेफनीने अगदी बिनधास्तपणे शेल्टनसोबत असलेल्या प्रेमाची कबुली दिली. 



स्टेफनीने सांगितले की, तो खूपच चांगला व्यक्ती आहे. मी त्याच्यावर जिवापाड प्रेम करते. तो खूप सुंदर असून, माझ्यासाठी त्याची ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्या स्वभावाचा गोडवा मला भावला असून, मी त्याच्यावर प्रेम करीत असल्याचे खुल्लम खुल्ला सांगू इच्छिते. 

स्टेफनी गायन शो ‘द वॉयस’च्या १२व्या सीजनमध्ये परतणार आहे. तिने या शोमध्ये शेल्टनच्या टीमला मात देण्यासाठी कंबर कसली असून, त्यासाठी ती जबरदस्त सराव करीत आहे. मात्र दोघांमधील या युद्धामुळे त्यांच्यातील संबंधांवर काही परिणाम होईल का? असे जेव्हा तिला विचारण्यात आले तेव्हा तिने यास नकार देत आमच्यातील प्रेम एवढे दुबळे नसल्याचे म्हटले आहे. 

दोघेही एकमेकांना २०१५ पासून डेट करीत आहेत. २०१४ मध्ये स्टेफनी आणि शेल्टन ‘द वॉयस’ या शोमध्ये भेटले होते. तेव्हाच स्टेफनी शेल्टनच्या प्रेमात पडली होती. तब्बल दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता हे जोडपे त्यांच्यातील संबंधांविषयी जाहीरपणे बोलत आहेत. 

Web Title: Gwen Stefani gave 'Khullam Khulla' love confession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.