सिल्वेस्टर स्टेलॉनने सेल्फीसाठी मागितले 75 हजार! चाहते म्हणाले, तुझ्यासाठी आम्ही किडनी विकणार नाही!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 12:40 IST2019-06-26T12:39:35+5:302019-06-26T12:40:56+5:30
होय, 72 वर्षांच्या सिल्वेस्टरसोबतच्या एका सेल्फीसाठी चाहत्यांना 1081 डॉलर म्हणजेच 75 हजारांवर रूपये मोजावे लागणार आहेत.

सिल्वेस्टर स्टेलॉनने सेल्फीसाठी मागितले 75 हजार! चाहते म्हणाले, तुझ्यासाठी आम्ही किडनी विकणार नाही!!
हॉलिवूडचा रॅम्बो अर्थात हॉलिवूड अभिनेता सिल्वेस्टर स्टेलॉन सध्या त्याच्या ‘रॅम्बो लास्ट ब्लड’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या प्रमोशनसाठी सिल्वेस्टर मँचेस्टर, लंडन अशा अनेक ठिकाणी जाणार आहे. साहजिकच त्याचे चाहते त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पण याचदरम्यान आपल्या या आवडत्या स्टारसोबत सेल्फी घेण्याची इच्छा असलेल्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. होय, मीडिया रिपोर्टनुसार, सिल्वेस्टर आता त्याच्यासोबतच्या सेल्फीसाठी पैसे वसूल करणार आहे.
होय, 72 वर्षांच्या सिल्वेस्टरसोबतच्या एका सेल्फीसाठी चाहत्यांना 1081 डॉलर म्हणजेच 75 हजारांवर रूपये मोजावे लागणार आहेत.
सप्टेंबरमध्ये होणा-या या प्रमोशन टूरमध्ये सहभागी व्हायचे असल्यास तिकिट आहे. आधी या तिकिटाचे दर 160 डॉलर होते. आता ही रक्कम 1081 डॉलर केली गेली आहे. या पॅकेजमध्ये सिल्वेस्टरचा लाईव इंटरव्ह्यू पाहायला मिळेल, श्विाय थ्री कोर्स डिनरची मेजवानी मिळेल. सोबत सिल्वेस्टरसोबत एक सेल्फीही घेता येईल. सिल्वेस्टरचा ऑटोग्राफ असलेल्या काही वस्तूंचा लिलावही याठिकाणी होणार आहे.
आयोजकांनी या तिकिटाचे समर्थन केले असले तरी चाहते मात्र यामुळे प्रचंड नाराज आहेत. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी बोलवून दाखवली आहे. एका सेल्फीसाठी 1081 डॉलर मोजावे लागत असेल तर आम्हाला त्या सेल्फीची गरज नाही. तुला भेटण्यासाठी आम्ही आमची किडनी विकणार नाही, असे एका युजरने लिहिले आहे. सेल्फीसाठी इतके पैसे मोजण्याऐवजी मी त्या पैशांचे बर्गर घेऊन खाईल, असे अन्य एका युजरने लिहिले आहे.