coronavirus : घरी बसून कंटाळा येत असेल तर पाहा ‘या’ धमाकेदार हॉलिवूड सीरिज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 03:07 PM2020-03-22T15:07:54+5:302020-03-22T15:10:11+5:30

कोरोना विषाणूचा संपूर्ण जगासह सिनेसृष्टीवरही मोठा परिणाम दिसून येत आहे. बरेच स्टार्स सोशल मीडियावर आपला मोकळा वेळ कसा घालवत आहेत याविषयी माहिती देत आहेत. तर आपल्याकडेही मोकळा वेळ असेल तर आपण खालील हॉलिवूड सीरिज पाहून घरच्या घरी आनंद लुटू शकता.

hollywood-movies-during-coronavirus-home-quarantine | coronavirus : घरी बसून कंटाळा येत असेल तर पाहा ‘या’ धमाकेदार हॉलिवूड सीरिज

coronavirus : घरी बसून कंटाळा येत असेल तर पाहा ‘या’ धमाकेदार हॉलिवूड सीरिज

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना विषाणूचा संपूर्ण जगासह सिनेसृष्टीवरही मोठा परिणाम दिसून येत आहे.बरेच स्टार्स सोशल मीडियावर आपला मोकळा वेळ कसा घालवत आहेत याविषयी माहिती देत आहेत.आपल्याकडेही मोकळा वेळ असेल तर आपण खालील हॉलिवूड सीरिज पाहून घरच्या घरी आनंद लुटू शकता.

-रवींद्र मोरे
कोरोना विषाणूचा संपूर्ण जगासह सिनेसृष्टीवरही मोठा परिणाम दिसून येत आहे. अशा परिस्थितीत स्टार्स केवळ स्वत: ला अलिप्त ठेवत नाहीत तर आपल्या चाहत्यांनाही घरी सुरक्षित राहण्याचा सल्ला देत आहेत. बरेच स्टार्स सोशल मीडियावर आपला मोकळा वेळ कसा घालवत आहेत याविषयी माहिती देत आहेत. तर आपल्याकडेही मोकळा वेळ असेल तर आपण खालील हॉलिवूड सीरिज पाहून घरच्या घरी आनंद लुटू शकता.

* द अ‍ॅव्हेंजर्स


'द अ‍ॅव्हेंजर्स' सीरिजचे एकूण २३ चित्रपट आहेत. त्यातील चार मुख्यत्वे अ‍ॅव्हेंजर मालिकेतील आहेत. २०१२ मध्ये ही सीरिज सुरू झाली होती आणि त्यानंतर २०१५ मध्ये अ‍ॅव्हेंजर्स : एज आॅफ अल्ट्रॉन, २०१८ मध्ये अ‍ॅव्हेंजर्स : द इनफिनिटी वॉर आणि २०१९ मध्ये याचा शेवटचा भाग अ‍ॅव्हेंजर्स : द एंड गेम रिलीज झाला होता. या सर्व सीरिजमध्ये सुपरहिरोजची काल्पनिक कथा असून जबरदस्त अ‍ॅक्शन दाखविण्यात आली आहे. या चित्रपटाचे सर्व भाग सुपरहिट झाले आहेत.

* फायनल डेस्टिनेशन
या चित्रपटाचे पाच भाग आहेत. सर्वांमध्ये मृत्यूला चकवा देण्याची कथा दाखविण्यात आली आहे. चित्रपटात एखाद्या व्यक्तीला हे समजते की तो एखाद्या कारणामुळे मरणार आहे पण तो जिवंत राहतो. त्यानंतर मृत्यू त्याचा कसा पाठलाग करतो, हे अत्यंत भयावय या सीरिजमध्ये दाखविण्यात आले आहे. हे चित्रपट पाहिल्यानंतर, गोष्टींकडे पाहण्याचा आपलाही दृष्टिकोन बदलेल. या चित्रपटाचा पहिला भाग २००० मध्ये प्रदर्शित झाला होता तर पाचवा भाग २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता.

* हॅरी पॉटर


जे के रोलिंग यांच्या पुस्तकावर आधारित हॅरी पॉटर या चित्रपटाचे एकूण ८ भाग आहेत. हा चित्रपट फक्त मुलांनाच नव्हे तर वयस्कांनाही खूप आवडला होता. यात जादूचे मोठमोठे अविष्कार दाखविण्यात आले असून खूपच थरारक आहेत. हा चित्रपट जादूगार हॅरी पॉटरच्या भोवती फिरतो ज्यामध्ये त्याचे काही मित्र नेहमी त्याच्या सोबत असतात. चित्रपटाचा पहिला भाग २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता तर शेवटचा भाग २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता.

* फास्ट अँड फ्यूरियस
जर आपल्याला कार स्टंटर्स आणि अ‍ॅक्शन आवडत असेल तर आपल्याला हे चित्रपट खूपच आवडतील. फास्ट अँड फ्यूरियस या चित्रपटाचे ८ भाग आहेत. चित्रपटाचा पहिला भाग २००१ आणि आठवा भाग २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट काही चोरांची कथा आहे जे चोरी आणि प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये कुटुंबालाही खूप महत्त्व दिले गेले आहे.

* मिशन इम्पॉसिबल


आपल्याला डिटेक्टिव्ह आणि गुप्त मिशन असलेले चित्रपट आवडत असतील तर मिशन इम्पॉसिबल सीरिज आपल्यासाठी मेजवानीच ठरेल. चित्रपटात टॉम क्रूज अमेरिकन स्पाई इथन हंटच्या भूमिकेत आहे. प्रत्येक चित्रपटात, इथनचे एक मिशन असते जे पूर्ण करणे जवळजवळ अशक्य असते. पण प्रत्येक वेळी इथन आपले मिशन पूर्ण करतो. आपल्याला चित्रपटात जबरदस्त सस्पेन्ससह अ‍ॅक्शनचा मसाला दिसेल. चित्रपटाचे ६ भाग आहेत.

Web Title: hollywood-movies-during-coronavirus-home-quarantine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.