‘द गॉडफादर’चे अभिनेते James Caan यांचं निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 10:39 AM2022-07-08T10:39:14+5:302022-07-08T10:39:53+5:30

James Caan Passes Away: जेम्स कान यांनी  हॉलिवूडमध्ये मोलाचं योगदान दिलं. त्यांनी सुमारे चार दशके हॉलिवूडवर राज्य केलं. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

Hollywood Oscar nominated actor Godfather star James Caan dies at 82 | ‘द गॉडफादर’चे अभिनेते James Caan यांचं निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

‘द गॉडफादर’चे अभिनेते James Caan यांचं निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

googlenewsNext

James Caan Passes Away:  ‘द गॉडफादर’ (The Godfather)या जगभर गाजलेल्या हॉलिवूडपटाचे अभिनेते जेम्स कान  (James Caan ) यांचे निधन झाले.  बुधवार 6 जुलैला वयाच्या 82 व्या  वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेम्स यांचे मॅनेजर मॅट डेलपियानो यांनी जेम्स यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. तथापि त्यांच्या निधनाचे कारण त्यांनी सांगितलं नाही. जेम्स कान यांनी  हॉलिवूडमध्ये मोलाचं योगदान दिलं. त्यांनी सुमारे चार दशके हॉलिवूडवर राज्य केलं. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

आपल्या सहा दशकांच्या करिअरमध्ये जेम्स कान यांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या. 1960 च्या दशकात त्यांनी हॉलिवूडमध्ये पर्दापण केलं. काऊंटडाऊन, द रेन पीपल, फनी लेडी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी  भूमिका साकारल्या.  मिझरी, एल्फ, चोर, गॉडफादर पार्ट-2, ब्रायन सॉन्ग आणि द गॅम्बलर यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी जबरदस्त भूमिका साकारल्या. 
2021 मध्ये प्रदर्शित ‘क्वीन बीज’ हा रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला.

जेम्स कान यांचं पूर्ण नाव जेम्स एडमंड कान होतं. ते एक अमेरिकन अभिनेते होते. चार गोल्डन ग्लोब, एक अ‍ॅमी व एक ऑस्करअशा अनेक पुरस्कारांसाठी त्यांना नामांकन मिळालं होतं. 1960 मध्ये फ्रान्सिस फोर्ड कोपोला यांनी जेम्स यांना ‘द रेन पीपल’मध्ये ब्रेक दिला. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘द गॉडफादर’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. ‘द गॉडफादर 2’च्या एका फ्लॅशबॅक सीक्वेन्समध्येही त्यांनी काम केलं होतं.

‘द गॉडफादर’  या चित्रपटानंतर ते करिअरच्या शिखरावर पोहोचले. यानंतर हॉलिवूडचा सर्वाधिक बिझी अभिनेता म्हणून ते ओळखले जाऊ लागले होते. 1980 च्या दशकात जेम्स त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले. कधी ड्रग्स सेवन तर कधी आपल्या संतापी स्वभावामुळे त्यांची चर्चा झाली. त्यांची लव्ह लाईफही वादग्रस्त ठरली. त्यांनी चार लग्न केलीत. पण यापैकी एकही लग्न यशस्वी ठरलं नाही.

अनुपम खेर यांची श्रद्धांजली

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी अभिनेत्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘ जेम्स कान यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. अनेक चित्रपटांमधील त्यांचा अभिनय आवडला. पण गॉडफादरमधली त्यांची व्यक्तिरेखा माझ्यासाठी सिनेविश्वाचा एक भाग होण्याचे कारण बनली. माझ्या मित्रा तुला शांती मिळो,’ असं ट्विट अनुपम खेर यांनी केलं आहे.

Web Title: Hollywood Oscar nominated actor Godfather star James Caan dies at 82

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.