'फास्ट अँड फ्युरिअस' स्टार विन डिजलवर लैंगिक छळाचा आरोप, तक्रार ऐकून उडेल थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 10:49 AM2023-12-22T10:49:38+5:302023-12-22T10:51:43+5:30
विन डिजलवर करण्यात आलेले आरोप अतिशय गंभीर आहेत.
हॉलिवूडची सुपरहिट फ्रँचायझी 'फास्ट अँड फ्युरियस' मधील लोकप्रिय अभिनेता विन डीजलचे (Vin Diesel) जगभरात चाहते आहेत. त्याचा फिटनेस, अभिनय याचं प्रेक्षक नेहमीच कौतुक करतात. मात्र विन डीजल वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याच्यावर असिस्टंटने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. गुरुवारी लॉस एंजिलिसमध्ये महिलेने त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण 2010 सालचं आहे. अटलांटा येथे 'फास्ट फाईव्ह' च्या सेटवर काम करत असताना विन डीजलने त्याच्या असिस्टंटसोबत जबरदस्ती केली. महिलेच्या तक्रारीनुसार, विनने तिला हॉटेलमधील खोलीत बोलावून घेतलं. नंतर तिला भिंतीवर आपटत तिच्यासमोरच घाणेरडे चाळे केले. नंतर तिला बेडवर ओढत बलात्कार करण्याचाही प्रयत्न केला. जर तिने शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिला तर नोकरीवर काढून टाकेन अशी धमकी तिला दिली. महिलेने नोकरीची पर्वा न करता जोरात ओरडत तिथून पळ काढला. यानंतर काही दिवसांनी विनच्या बहिणीने तिला कामावरुन काढत असल्याचा फोन केला होता.
कायदेशीर तक्रारीनुसार, महिलेला विन डिजेलच्या कंपनीने काम करण्यास सांगितलं होतं. त्याचे सोशल इव्हेंट्स मॅनेज करणं, इव्हेंट्समध्ये त्याच्यासोबत असणं हे तिचं काम होतं. कंपनीच्या प्रवक्त्याने क्लाएंटसोबत उभं राहिल्याचा आणि विन विरोधात आवाज उठवण्यावर अभिमान व्यक्त केला आहे. आता यावर कायदेशीररित्या काय कारवाई होते हे बघणं महत्वाचं आहे. मात्र विन डिजलच्या करिअरवर याचा परिणाम नक्कीच होऊ शकतो.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही विन डिजलसोबत काम केले आहे. 2017 साली XXX रिटर्न ऑफ झँडर केज' सिनेमातून दीपिकाने हॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यामध्ये विन डिजल मुख्य अभिनेता होता. तेव्हा दोघांच्या केमिस्ट्रीची चर्चा रंगली होती.