शकीराच्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2016 06:47 PM2016-11-18T18:47:38+5:302016-11-18T18:47:38+5:30

प्रसिद्ध गायिका शकीरा हिच्या मुलाची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती. तो सतत आजारी राहत असल्याने शकीराच्या चिंतेत भर ...

Improve the health of Shakyar's son | शकीराच्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा

शकीराच्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा

googlenewsNext
रसिद्ध गायिका शकीरा हिच्या मुलाची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती. तो सतत आजारी राहत असल्याने शकीराच्या चिंतेत भर पडली होती, मात्र आता त्याची तब्येत सुधारत असल्याचे खुद्द शकीरानेच ट्विट करून सांगितले आहे. 
शकीराने ट्विटरवर मुलासोबतचा एक फोटो शेअर केला असून, तो आता तंदुरुस्त असल्याचे फोटोखाली म्हटले आहे. शकीराने म्हटले की, आजारी सशा याच्या प्रकृतीसाठी तुम्ही पाठविलेल्या संदेशाकरिता मी तुम्हा सगळ्यांचीच ऋणी आहे. तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की, सशाची तब्येत सुधारत असून, तो एकदम तंदुरुस्त आहे. 
शकीराने मुलाच्या आजारपणामुळे आगामी लॅटिन ग्रॅमी आणि अमेरिकी संगीत पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहणार नसल्याचे गेल्या ७ नोव्हेंबर रोजीच जाहीर केले होते. ट्विटवर तिने म्हटले होते की, व्यक्तीगत कारणांमुळे मी या समारंभात उपस्थित राहणार नाही. परंतु मुलाची तब्येत बरी असल्याने ती या समारंभात उपस्थित राहणार की नाही याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. 
शकीराने ट्विटवर मुलाच्या प्रकृतीची माहिती दिल्यानंतर तिच्या फॅन्सनी त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. शकीराने देखील सर्व फॅन्सचे आभार मानताना आता मी पुन्हा स्टेजवर परतू शकेन असे म्हटले आहे. 
शकीराच्या या ट्विटनंतर लॅटिन ग्रॅमी व अमेरिकी संगीत पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांकडून तिला शोमध्ये उपस्थित राहण्यासाठी विनंती केली जात आहे. यासाठी तिच्याशी संपर्क केल्याची माहिती समोर येत आहे. परंतु अद्यापपर्यंत शकीराकडून उपस्थित राहण्याबाबतचे कुठलेही ठोस असे वक्तव्य केले नसल्याने ती सोहळ्यात सहभागी होईल की नाही हे बघणे उत्सुकतेचे ठरेल. 


Web Title: Improve the health of Shakyar's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.