VIDEO: ख्रिस मार्टिनचं मराठी ऐकलं का? मुंबईतील कॉन्सर्टमध्ये चाहत्यांसोबत साधला मराठीत संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:31 IST2025-01-21T17:27:10+5:302025-01-21T17:31:57+5:30
सध्या सगळीकडे ब्रिटीश बॅंड 'कोल्डप्ले' ची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

VIDEO: ख्रिस मार्टिनचं मराठी ऐकलं का? मुंबईतील कॉन्सर्टमध्ये चाहत्यांसोबत साधला मराठीत संवाद
Chris Martin Video: सध्या सगळीकडे ब्रिटीश बॅंड 'कोल्डप्ले' ची सर्वत्र चर्चा रंगली आहे. coldplay बँड तब्बल ९ वर्षांनी भारतात परफॉर्म केला त्यामुळे चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली. दरम्यान, नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये बहुप्रतिक्षित 'coldplay' कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये 'कोल्डप्ले'चा फिव्हर संगीतप्रेमींमध्ये पाहायला मिळतो आहे. त्यानंतर आता या कॉन्सर्टमधील वेगवेगळे व्हिडीओ, फोटो समोर येत आहे.
नुकताच सोशल मीडियावर कोल्डप्लेच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये coldplay चा मुख्य गायक क्रिस मार्टिनने मुंबईकरांसोबत मराठीत संवाद साधला. व्हिडीओमध्ये कॉन्सर्टच्या सुरुवातीला ख्रिस मार्टिन म्हणतो, कसं काय, तुम्ही सगळे ठीक आहे. तुम्ही सगळे आज छान दिसत आहात. शुभ संध्याकाळ! तुमचं सर्वांचं कॉन्सर्टमध्ये खूप खूप स्वागत. मुंबईत येऊन मला आम्हाला खूप आनंद झाला आहे. त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. इथे येऊन तुम्ही आम्हाला परफॉर्म करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद! ख्रिस मार्टिनच्या या संवादाने प्रेक्षकांचं मन जिंकलं.
'कोल्डप्ले' बँड आपल्या 'म्युझिक ऑफ द स्फीअर्स वर्ल्ड टूरवर आहेत. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये १८,१९ आणि २१ जानेवारी रोजी त्यांचे तीन शो संपन्न झाले. यामधून ते आपल्या परफॉर्मन्सने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत.क्रिस मार्टिनसोबत त्याची गर्लफ्रेंड डकोटा जॉन्सनही आली आहे.