जॅकी चॅनची मुलगी झाली बेघर; समलैंगिक असल्यामुळेच आली ही वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 11:23 AM2018-05-02T11:23:35+5:302018-05-02T17:48:29+5:30

हॉलिवूड स्टार आणि मार्शल आर्ट चित्रपटांचा उस्ताद जॅकी चॅनची मुलगी बेघर झाली आहे. तिने दावा केला की, समलैंगिक असल्यामुळेच ही वेळ आली आहे.

Jackie Chan's daughter becomes homeless; This is the time for gay! | जॅकी चॅनची मुलगी झाली बेघर; समलैंगिक असल्यामुळेच आली ही वेळ!

जॅकी चॅनची मुलगी झाली बेघर; समलैंगिक असल्यामुळेच आली ही वेळ!

googlenewsNext
लिवूड स्टार आणि मार्शल आर्ट चित्रपटांचा उस्ताद जॅकी चॅनच्या मुलीने एक खळबळजनक खुलासा केला आहे. जॅकीची मुलगी एटा नेग चोक लामचा एक व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती बेघर होण्याचे कारण होमोफोबिक पेरेंट्स (समलैंगिकतेला स्वीकार न करणारे) असल्याचे सांगत आहे. एटाने दावा केला की, मी बेघर होण्याच्या स्थितीत आहे. गेल्यावर्षी आॅक्टोबर महिन्यात एटाने समलैंगिक असल्याचा स्वीकार करताना गर्लफ्रेंड एंडी अ‍ॅटमसोबत कॅनडा गाठले होते. आता या दोघींनीही हा व्हिडीओ शेअर करीत लोकांना मदतीचे आवाहन केले आहे. तसेच हा व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याची विनंतीही केली आहे.
 

या व्हिडीओमध्ये १८ वर्षीय एटा म्हणतेय की, ‘मला हे अजिबातच समजत नाही की, अखेर काय होत आहे? कारण आम्ही पोलिसांकडे गेलो होतो. हॉस्पिटलमध्येही गेलो. तसेच फुडबॅँक, एलजीबीटीक्यू कम्युनिटी, शेल्टर्स यांच्याकडेही जाऊन आलो. परंतु कोणीही आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही. आम्ही गेल्या महिन्यापासून होमलेस आहोत. याचे एकमेव कारण आमचे होमोफोबिक पेरेंट्स आहेत. बºयाचदा तर आमच्यावर पुलाखाली झोपण्याची वेळ आली आहे.’ यावेळी एटाने हादेखील दावा केला की, त्यांचे काही मित्र त्यांना मदत करीत आहेत. 



एटा नेग जॅकी चॅन आणि माजी ब्यूटी क्वीन एलेन नेग यी लाई यांची मुलगी आहे. एटाचा जन्म १९९९ मध्ये झाला. असे म्हटले जाते की, आईसोबतच्या तणावपूर्ण संबंधांमुळे तिला शाळेतून काढून टाकण्यात आले होते. यावर तिच्या आईने म्हटले होते की, एटा आणि एंडीने जॅकी चॅन यांच्या नावाचा आधार न घेता आपल्या हिमतीवर उभे राहायला हवे. दरम्यान, जॅकीची मुलगी सध्या अडचणीत असून, ती लोकांना मदतीचे आवाहन करीत आहे. 

Web Title: Jackie Chan's daughter becomes homeless; This is the time for gay!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.