Congratulations! जेनिफर लॉरेन्सने गुपचूप उरकला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 14:57 IST2019-02-06T14:56:02+5:302019-02-06T14:57:41+5:30
हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेन्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, जेनिफरचा साखरपुडा झालाय. नऊ महिन्यांच्या डेटींगनंतर जेनिफरने आर्ट गॅलरीचा दिग्दर्शक कुक मैरोने याच्यासोबत साखरपुडा केला.

Congratulations! जेनिफर लॉरेन्सने गुपचूप उरकला साखरपुडा
हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेन्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, जेनिफरचा साखरपुडा झालाय. नऊ महिन्यांच्या डेटींगनंतर जेनिफरने आर्ट गॅलरीचा दिग्दर्शक कुक मैरोने याच्यासोबत साखरपुडा केला.
पेज सिक्सने दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडे न्यूयॉर्क सिटीत कुकसोबत फिरताना जेनिफरच्या बोटात साखरपुड्याची अंगठी दिसली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जेनिफरच्या बोटात हि-याची एक मोठी अंगठी होती. जेनिफर व कुक एका कोप-याच्या कडेला बसलेले होते. तिच्या हातातील अंगठी लक्ष वेधून घेत होती.
जेनिफरच्या प्रवक्त्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लवकरच जेनिफर व कूक विवाहबद्ध होणार असल्याचे त्याने सांगितले.
कुक मैरोनेच्या आधी जेनिफर दिग्दर्शक डेरेन एरोनोफ्सकीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. डेरेनने दिग्दर्शित केलेल्या ‘मदर’ चित्रपटात जेनिफर लीड रोलमध्ये होती.
२००६ सालापासून अमेरिकन सिने व टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारी लॉरेन्स २०१० सालच्या विंटर्ज बोन या चित्रपटानंतर प्रसिद्धीझोतात आली. या चित्रपटासाठी तिला आॅस्कर व गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले. २०१२ सालच्या सिल्व्हर लाइनिंग प्लेबूक या सिनेमासाठी लॉरेन्सला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आॅस्कर पुरस्कार मिळाला.