Jennifer Lopez आणि Ben Affleck ने २० वर्षांनी पुन्हा केला साखरपुडा, याआधी मोडलं होतं लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 02:44 PM2022-04-09T14:44:40+5:302022-04-09T14:47:15+5:30
Jennifer Lopez-Ben Affleck Engagement : जेनिफर लोपेजच्या प्रतिनिधीने बेन एफ्लेकसोबतच्या साखरपुड्याला दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी अफवा होती की, कपलने पुन्हा एकदा साखरपुडा केला आहे.
हॉलिवूड गायिका व अभिनेत्री जेनिफर लोपेज (Jennifer Lopez) आणि अभिनेता बेन एफ्लेक (Ben Affleck) ने पुन्हा एकदा नातं पुढच्या लेव्हलला नेण्याचा निर्णय घेतला आहे. २० वर्षांनंतर पुन्हा एकदा दोघांनी साखरपुडा केला आहे. एलेक्स रॉड्रिग्ज (Alex Rodriguez) सोबत ब्रेकअपनंतर जेनिफर लोपेज पुन्हा एकदा बेनच्या जवळ येताना दिसली आणि दोघांमध्ये रोमान्स सुरू झाला होता.
जेनिफर लोपेजच्या प्रतिनिधीने बेन एफ्लेकसोबतच्या साखरपुड्याला दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी अफवा होती की, कपलने पुन्हा एकदा साखरपुडा केला आहे. अफवांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी जेनिफरने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्याने त्यांच्या साखरपुड्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.
लोपेजने जो व्हिडीओ शेअर केला त्यात बॅकग्राउंडमध्ये म्युझिक वाजत आहे. व्हिडीओत लोपेजच्या आवाजात ‘यू आर परफेक्ट’ हेही ऐकायला येत आहे. तिने इन्स्टाग्रामवर लिहिलं की, 'मी याची घोषणा करताना फार उत्साही आहे. पण दोघांनी कधी साखरपुडा केला हे स्पष्ट होऊ शकलं नाही. हॉलिवूडमध्ये हे दोन्ही स्टार्स पार्टीज, इव्हेंट, रेड कार्पेटवर एकमेकांसोबत कवालिटी टाइम स्पेंड करताना दिसले होते.
२० वर्षाआधीही हे कपल सोबत होतं. दोघांना त्यांच्या फॅन्सने 'बेनिफर' असं नाव दिलं होतं. दोघांनी २००२ मध्ये साखरपुडा केला होता. पण साखरपुड्यानंतर त्यांचं नातं दुरावू लागलं होतं आणि दोघांनी साखरपुडा मोडला होता.
लोपेजने केली तीन लग्ने
लोपेजचं पहिलं लग्न १९९७ मध्ये अभिनेता ओजनी नोआसोबत झालं होतं. हे लग्नं १९९८ मध्ये मोडलं. त्यानंतर २००१ मध्ये लोपेजने अमेरिकन अभिनेता-कोरिओग्राफर क्रिस जडसोबत लग्न केलं होतं. पण हे लग्न केवळ २ वर्ष टिकलं. त्यानंतर जेनिफरने गायक मार्क एंथनीसोबत २००४ मध्ये लग्न केलं होतं. मार्क आणि जेनिफरचा संसार १० वर्ष चालला. २०१४ मध्ये दोघे वेगळे झाले. आता तिच्या या साखरपुड्यानंतर पुन्हा एकदा लोक अंदाज लावत आहेत की, हे लग्न होणार की, आधीसारखंच तुटणार?