Video: रणवीरनंतर ५१ वर्षीय अभिनेत्रीने शेअर केलं न्यूड फोटोशूट; अॅक्ट्रेसचे फोटो पाहून व्हाल दंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 16:14 IST2022-07-28T16:14:04+5:302022-07-28T16:14:59+5:30
Jennifer lopez: प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेजने रणवीर सिंगवर मात करणारं फोटोशूट केलं आहे.

Video: रणवीरनंतर ५१ वर्षीय अभिनेत्रीने शेअर केलं न्यूड फोटोशूट; अॅक्ट्रेसचे फोटो पाहून व्हाल दंग
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग न्यूड फोटोशूट करुन चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने न्यूड फोटोशूट करुन यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. यामध्येच कलाविश्वातील अनेक कलाकारांनी त्याला पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे एकीकडे रणवीरची चर्चा थांबायचं नाव नसतानाच एका ५१ वर्षाच्या अभिनेत्रीने न्यूड फोटोशूट केलं आहे.
प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेज (Jennifer Lopez) साऱ्यांनाच ठावूक आहे. जेनिफर तिच्या करिअरपेक्षा बोल्डनेसमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. यावेळी तिने रणवीर सिंगवर मात करणारं फोटोशूट केलं आहे. जेनिफरने वयाच्या ५१ व्या वर्षी न्यूड फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचा बिहाईंड द सीनचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
जेनिफरने तिच्या वाढदिवसाचं निमित्त साधत हा व्हिडीओ शेअर केला. सोबतच एक मेसेजही चाहत्यांना दिला आहे. "आपण आपल्या त्वचेकडे आणि चेहऱ्याकडे विशेष लक्ष देतो. पण, तितकंच लक्ष आपल्या शरीराकडे देत नाही. माझ्या शारीरिक गरजा लक्षात घेता एक स्किनकेअर रुटीन तयार करणं महत्त्वाचं होतं", असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं.
दरम्यान, जेनिफर लोपेज ही प्रसिद्ध अमेरिकन गायिका, अभिनेत्री आणि डान्सर आहे. तसंच तिने फॅशन जगतातही नशीब आजमावलं आहे. जेनिफरने 'सेलिना', 'आउट ऑफ साइट', 'एंजल आइस' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.