हिलेरींच्या प्रचारार्थ जेनिफर, मार्क एंथनी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2016 08:56 PM2016-11-02T20:56:33+5:302016-11-02T20:56:33+5:30

गायिका जेनिफर लोपेज आणि तिचा पहिला पती मार्क एंथनी सध्या अमेरिकी राष्टÑपती पदाच्या प्रबळ उमेदवार हिलेरी क्लिंटन यांच्या प्रचार ...

Jennifer, Marc Anthony for the promotion of Hillary | हिलेरींच्या प्रचारार्थ जेनिफर, मार्क एंथनी

हिलेरींच्या प्रचारार्थ जेनिफर, मार्क एंथनी

googlenewsNext
यिका जेनिफर लोपेज आणि तिचा पहिला पती मार्क एंथनी सध्या अमेरिकी राष्टÑपती पदाच्या प्रबळ उमेदवार हिलेरी क्लिंटन यांच्या प्रचार मोहिमेत सक्रिय सहभागी झाले आहेत. एका कन्सर्ट दरम्यान दोघेही एकत्र येत त्यांनी अमेरिकी जनतेला हिलेरी यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. 
‘एंटरटेन्मेंट टुनाइट’ने दिलेल्या माहितीनुसार लोपेज आणि एंथनी यांनी हिलेरीबरोबरच व्यासपीठावर उपस्थिती लावली. तसेच हिलेरी यांना हस्तांदोलन करीत उपस्थित लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पुढे दोघांनीही या कन्सर्टचे काही फोटोग्राफस् इन्स्टाग्रामवर शेअर केले. एंथनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, माझे हिलेरी यांना पूर्ण समर्थन आहे. त्यांच्याबरोबर स्टेज शेअर केल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. तुमचे मत अमूल्य आहे. मी हिलेरीबरोबर आहे, तुम्ही कोणाबरोबर आहात? हिलेरी यांना मत द्या. तर लोपेजने लिहिले की, आजच्या रात्री मला आमंत्रित केल्याबद्दल आयोजकांचे आभार. हे खरोखरच अद्भुत आहे. फक्त हिलेरी यांना मतदान करा. लोकांना कुठलाही विचार न करता हिलेरी यांना मतदान करावे. ट्रम्पला बाजूला सारा. अशा शब्दांमध्ये तिने हिलेरी यांना समर्थन दिले. 
दरम्यान, अमेरिकी राष्टÑाध्यक्षपदाच्या निवडणुकीत हॉलिवूड स्टार्सचे समर्थन महत्त्वपूर्ण समजले जात असून, यामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिलेरी आघाडीवर आहेत. बहुतेक हॉलिवूड स्टार्सने त्यांना समर्थन दिले असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची बाजू काहीसी कमकुवत झाल्याचे बघावयास मिळत आहे. 
लवकरच मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याने जेनिफर लोपेज आणि मार्क एंथनी यांनी नागरिकांना केलेले आवाहन महत्त्वपूर्ण समजले जात आहे.

Web Title: Jennifer, Marc Anthony for the promotion of Hillary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.