‘द ग्रेट वॉल’मुळे जिंग टियांसला मिळणार सशक्त महिलेची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2017 03:32 PM2017-02-03T15:32:21+5:302017-02-03T21:02:21+5:30

हॉलिवूड अभिनेता मॅट डेमन सध्या ‘द ग्रेट वॉल’ या सिनेमात चिनी अभिनेत्री जिंग टियांसने साकारलेल्या भूमिकेचे तोंडभरून कौतुक करीत ...

Jing Tianas will get the identity of a powerful woman due to 'The Great Wall' | ‘द ग्रेट वॉल’मुळे जिंग टियांसला मिळणार सशक्त महिलेची ओळख

‘द ग्रेट वॉल’मुळे जिंग टियांसला मिळणार सशक्त महिलेची ओळख

googlenewsNext
लिवूड अभिनेता मॅट डेमन सध्या ‘द ग्रेट वॉल’ या सिनेमात चिनी अभिनेत्री जिंग टियांसने साकारलेल्या भूमिकेचे तोंडभरून कौतुक करीत आहे. सिनेमात जिंग टियांसने लिन माएची भूमिका साकारली होती. मॅट डेमनच्या मते, टियांसने सिनेमात एका सशक्त महिलेची भूमिका साकारलेली आहे. या भूमिकेमुळे तिला ‘द वुमेन अ‍ॅण्ड द वॉल’ अशा नावाने ओळखले जावे. 



डेमनने जिंग टियांससच्या लिन माए या भूमिकेविषयी सांगताना म्हटले की, सिनेमात लिन माए अखेरीस संपूर्ण सेनेची जनरल इन चार्ज बनतेय, त्यामुळेच तिची भूमिका एका सशक्त महिलेची आहे. संपूर्ण सिनेमात तिचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. सिनेमात तिचा दरारा हा खरोखरच कौतुकास्पद असून, भविष्यात तिला ‘द वुमेन अ‍ॅण्ड द वॉल’ या नावाने ओळखले जाण्याची शक्यता असल्याचेही त्याने म्हटले आहे. 

मॅट डेमनच्या या कौतुकाला उत्तर देताना टियांसने म्हटले की, सिनेमात मी साकारलेली लिन माएची भूमिका चिनी सैन्याचे नेतृत्त्व करणारी आहे. ती खूपच शक्तिशाली, धैर्य असलेली विश्वासू दृढनिश्चियी धाडसी स्वभावाची महिला दाखविण्यात आली आहे. ही भूमिका नारी शक्तीसाठी आदर्श उदाहरण ठरू शकेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला. झेंग यिमोयू दिग्दर्शित हा सिनेमा भारतात युनिव्हर्सल पिक्चर्सद्वारा ३ फेब्रुवारी रोजी रिलिज करण्यात आला आहे. 



या सिनेमाकडून मॅट डेमन आणि जिंग टियांस या दोघांनाही भरपूर अपेक्षा असून, प्रेक्षकांना जिंक टियांसची भूमिका नक्कीच भावणार असल्याचा कयास निर्मात्यांकडून व्यक्त केला जात आहे. 

Web Title: Jing Tianas will get the identity of a powerful woman due to 'The Great Wall'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.