प्रियांका चोप्राच्या घरात पडणार फूट; सोफी टर्नर- जो जोनास होणार विभक्त?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 06:59 PM2023-09-04T18:59:44+5:302023-09-04T19:11:42+5:30

Joe jonas and sophie turner: ही जोडी लॉस एंजेलिसमधील एका वकिलाशी घटस्फोटासंदर्भात सल्लामसलतही करत आहेत.

joe-jonas-and-sophie-turner-are-headed-toward-divorce-after-4-years-of-marriage | प्रियांका चोप्राच्या घरात पडणार फूट; सोफी टर्नर- जो जोनास होणार विभक्त?

प्रियांका चोप्राच्या घरात पडणार फूट; सोफी टर्नर- जो जोनास होणार विभक्त?

googlenewsNext

‘गेम ऑफ थ्रोन्स’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोफी टर्नर ( sophie turner) आणि पॉप सिंगर जो जोनास (Joe jonas) ही जोडी लवकरच विभक्त होणार आहे. या दोघांच्या नात्यात दुरावा आल्यामुळे ते कायदेशीररित्या घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या कुटुंबात आता फूट पडणार की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सोफी आणि जो जोनास यांनी २०१९ मध्ये लग्नगाठ बांधून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. परंतु, लग्नाच्या ४ वर्षांमध्येच ते विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'हिंदुस्थान टाइम्स'च्या वृत्तानुसार, सोफी आणि जो यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून मतभेद सुरु आहेत. त्यामुळे ते लॉस एंजेलिसमधील एका वकिलाशी सल्लामसलतही करत आहेत. परंतु, या वृत्ताविषयी जोनास कुटुंबीय आणि प्रियांका यांनी अद्याप कोणतही भाष्य केलं नाही. 

दरम्यान, जो आणि सोफी यांनी त्यांचं मियामीमधील घरदेखील विकलं आहे. जो आणि सोफी ही जोडी २०१६ पासून एकमेकांना डेट करत होती. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये साखरपुडा केला. तर, २०१९ मध्ये लग्न केलं. त्याचसोबत या जोडीला दोन मुलंदेखील आहेत. जो हा निक जोनास याचा मोठा भाऊ आहे. त्यामुळे जो आणि सोफी खरोखरच विभक्त होणार की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
 

Web Title: joe-jonas-and-sophie-turner-are-headed-toward-divorce-after-4-years-of-marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.