मुलांवरून जोली-पिट यांच्यात करार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2016 06:16 PM2016-11-08T18:16:01+5:302016-11-08T18:17:01+5:30

अ‍ॅँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांचा यावर्षीचा सर्वात चर्चिला जाणारा घटस्फोट ठरला आहे. दर दिवसाला यातील काही ना काही ...

Jolie and Pitt contracted children | मुलांवरून जोली-पिट यांच्यात करार

मुलांवरून जोली-पिट यांच्यात करार

googlenewsNext
ॅँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांचा यावर्षीचा सर्वात चर्चिला जाणारा घटस्फोट ठरला आहे. दर दिवसाला यातील काही ना काही अपडेट समोर येत आहेत. आता मुलांच्या कस्टडीवरून एक बातमी समोर आली असून, अ‍ॅँजेलिना आणि ब्रॅड पिट यांच्यात मुलांसाठीचा एक संरक्षण करार करण्यात आला आहे. 
या करारानुसार सर्व मुलांची कस्टडी अ‍ॅँजेलिना जोली हिच्याकडे असेल. मात्र ‘मेडिकल’सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास मुले वडील पिट यांच्याकडे जावू शकतात. एका आॅनलाइन साप्ताहिकाने दिलेल्या माहितीनुसार जोली आणि पिट यांना सहा मुले आहे. 
मॉडोक्स जोली-पिट (वय-१५)
पॅक्स जोली-पिट (वय-१२)
जहारा जोली-पिट (११)
शिलोह जोली-पिट (१०)
नॉक्स आणि विवियन जोली-पिट  (जुळे मुले) वय-८
अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व मुले आई जोलीकडे राहणार आहेत. जोली हिच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले की, आठवडाभरापूर्वी जोली आणि पिट यांच्यात मुलांवरून एक कायदेशीर करार करण्यात आला आहे. त्यावर दोघांच्याही सह्या आहेत. या करारानुसार सहाही मुले आईकडे राहतील. तर वैद्यकीय परिस्थितीप्रसंगी ते वडिलांकडे जावू शकतात. मुलांच्या आयुष्याचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आले. 
पुढे बोलताना सांगितले की, आम्ही याविषयी मुलांप्रती काळजी बाळगून असलेल्या सर्व लोकांची मते विचारात घेतली. मुलांवर या घटनेचा काहीही परिणाम होवू नये याचीही यावेळी खबरदारी घेतली. सर्व लोकांच्या संमतीनेच हा करार करण्यात आला. एक बाब स्पष्ट आहे की, कुटुंबाप्रती सर्वांनी संवेदनशीलपणे विचार करायला हवा. जेव्हा मेडिकलविषयीची स्थिती निर्माण होईल तेव्हा सर्व हितचिंतक यावर त्यांचे विचार मांडू शकतील, अशाप्रकारचा अधिकार देखील करारात अबाधित ठेवला आहे. गेल्या शुक्रवारी पिटने मुलांच्या कस्टडीसाठी अर्ज सादर केला होता. याच्या उत्तरार्थ जोलीने मुलाची एकहाती कस्टडी मागितली होती. त्यावर जोलीच्या बाजूने निकाल लागला. 

Web Title: Jolie and Pitt contracted children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.